''अनिल देशमुख गायब..कोणाला दिसले तर कळवा'' - Anil Deshmukh is missing says bjp Kirit Somaiya | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

  ''अनिल देशमुख गायब..कोणाला दिसले तर कळवा''

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी समाजमाध्यमांवरुन व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देखमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी छापा टाकला. नागपूरमधील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्या ठिकाणी ईडीने तपासणी केली. या ठिकाणी ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यामुळे देखमुख यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.  त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी समाजमाध्यमांवरुन व्हिडिओ शेअर केला आहे.

किरीट सोमय्या व्हिडिओमध्ये म्हणतात, अनिल देशमुख हे गायब झाले आहेत. कोणाला दिसले तर कळवा. एक हजार कोटी रुपयांची माया जमवणाऱ्या अनिल देशमुख यांना ईडी ने तीन नोटीस बजावले आहेत...त्यांचा शोध घेतला जात आहे मात्र ते सापडत नाहीत.  Anil Deshmukh is missing says bjp Kirit Somaiya

''ईडीने तीन वेळा समन्स बजावले, धाडी घातल्या मुंबई, नागपूरमध्ये नाही. ते सापडत नाही त्यांनी एक हजार कोटींची माया जमवली आहे. शंभर कोटीचा गैरव्यवहार सिद्ध झाला आहे. ते कुणाला दिसले तर कळवा,'' असे सोमय्या म्हणाले. 

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांची अंदाजे ४ कोटींची मालमत्ता १६ जुलैला जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल अनिल देशमुख यांच्या एका निकटवर्तीयाला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.   ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांचे मुळगाव असलेल्या वडविहिरा येथे छापा टाकला.  त्यांच्या काटोल येथील घराची देखील झाडाझडती घेतली. त्यावेळी देशमुख यांच्या समर्थकांनी ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप करत घोषणा बाजी केली.  

या आधी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने कोठडी सुनावली होती. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये देशमुख यांची भूमिका होती, असे त्यांचे संजीव पलांडे यांनी सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ईडीने केला होता. 
 
स्वबळाची भाषा बोलणारे काँग्रेस नेते मोदी-पवार भेटीमुळे अचंबित!
मुंबई : काँग्रेस नेत्यांच्या, प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या रोजच्या भूमिका, विधाने आणि इशाऱ्यांमुळे गेल्या काही दिवस काँग्रेसच्या गोटात उत्साह असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना बोलावून काँग्रेसच्या मनात नेमके काय चालले आहे. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख