मोठी बातमी : अनिल देशमुख प्रकरणात CBIच्या अधिकाऱ्याला अटक

देशमुख यांच्या लिगल टीमने सीबीआयचे उपनिरिक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं आढळले आहे.
442Sarkarnama_20Banner_20_202021_03_21T213113.769.jpg
442Sarkarnama_20Banner_20_202021_03_21T213113.769.jpg

मुंबई  : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukhयांना सीबीआयनं क्लीनचीट दिल्याचा सीबीआयचा कथित अहवाल मागील आठवड्यात सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याप्रकरणी सीबीआयने cbi सीबीआय़चे उपनिरिक्षकालाअटक केली आहे.  हा अहवाल बाहेर आल्यानंतर सीबीआयनं केलेल्या प्राथमिक तपासात देशमुख यांच्या लिगल टीमने सीबीआय कार्यालयातील उपनिरिक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं आढळले आहे.  तिवारी यांना सीबीआयने अटक केली आहे. 

सीबीआयनं देशमुख यांच्या प्राथमिक चौकशी अहवालात फेरफार केल्याप्रकरणी काल सायंकाळी मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ही व्यक्ती देशमुख यांच्या लिगल टीममधील आहे. 29 ऑगस्ट रोजी हा अहवाल व्हायरल झाला होता. त्यामध्ये देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयनं क्लीनचीट दिल्याचं म्हटलं होतं.
सरकारला गुडघे टेकायला लावू ; राजू शेट्टींचा इशारा
सीबीआयनं कथित क्लीनचीट अहवाल लीक झाल्याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यामध्ये देशमुख यांच्या लिगल टीमकडून सीबीआय कार्यालयातील एकाला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे काल समोर आलं आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कडक करावाई केली जाणार असल्याचंही या एएनआयच्या वृत्तात म्हटलं होत. या कटामध्ये आणखी व्यक्ती सहभागी आहे किंवा नाही, याबाबच चौकशी सुरू असल्याचंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 

अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तपास यंत्रणांनी त्यांच्या भोवतीचा फास आणखी आवळत चालवला आहे. सीबीआयने काल रात्री त्यांचे जावई गौरव चतुर्वेदी व वकील आनंद डागा यांना ताब्यात घेतलं होतं. गौरव यांची सुमारे वीस मिनिटे चौकशी केल्यानंतर सीबीआयकडून सोडण्यात आलं. डागा यांची मात्र अजूनही चौकशी सुरू असल्याचं समजतं.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. परमबिर सिंह याच्या लेटरनंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com