राणे म्हणतात, "पवारसाहेब शहांना भेटले तर त्यात नवल वाटायचं कारण नाही.."

पवार-शहा भेटीचे कारण कळू शकले नाही. एका गुजराती वर्तमानपत्रामध्ये या भेटीची बातमी आल्यानंतर त्यावर राजकीय चर्चा सुरू झाली.
Sarkarnama Banner.jpg
Sarkarnama Banner.jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल काल अहमदाबादमध्ये गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याची चर्चा आहे. अहमदाबाद येथे एका खास विमानाने शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल गेले. त्याठिकाणी एका बड्या उद्योगपतीचीही त्यांची भेट झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर ते दोघे अमित शहांना भेटले. 

पवार-शहा भेटीचे कारण कळू शकले नाही. तसेच भेटीत काय चर्चा झाली याबद्दलही अधिकृतपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. एका गुजराती वर्तमानपत्रामध्ये या भेटीची बातमी आल्यानंतर त्यावर राजकीय चर्चा स्वाभाविकपणे सुरू झाली. भाजपचे नेते निलेश राणे यांनी याबाबत टि्वट केलं आहे. यात राणे म्हणतात, "शरद पवार साहेब जर अमित शहा साहेबांना भेटले तर त्यात नवल वाटायचं कारण नाही कारण शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा नेम नसतो."  

ही भेट झाल्याचे शहा यांनीही नाकारलेले नाही. भेटीबाबत त्यांना विचारले असता 'प्रत्येक भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही नाही', असे म्हणत शहा यांनी या भेटीबाबतचे गुढ कायम ठेवले. या भेटीवरून राज्यात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. 

मागील काही दिवसांपासून सचिव वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त  परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब, गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांचा गोपनीय अहवाल आदी मुद्यांनी महाविकास आघाडी सरकार घेरले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. या सर्व प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

"स्वतःचं अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकार लोकांवर जमावबंदी लादत आहे. शिवसेनेच्या आमदार, खासदारांना वेगळा न्याय आहे म्हणून उघडपणे त्यांची मस्ती चालू आहे पण सामान्य जनतेला सरकारच्या नियमांचा त्रास सहन करावा लागतोय," असेही टि्वट करीत निलेश राणे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com