अंबानींच्या निवासस्थाना बाहेर सापडलेल्या स्फोटकांचा संबध तिहार कारागृहाशी?.. मोबाइल जप्त - Ambani security scare mobile seized from tihar jail delhi police | Politics Marathi News - Sarkarnama

अंबानींच्या निवासस्थाना बाहेर सापडलेल्या स्फोटकांचा संबध तिहार कारागृहाशी?.. मोबाइल जप्त

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

तहसीन अख्तर उर्फ सोनू जवळील फोन आता न्याय वैद्यक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

नवी दिल्ली :  उद्योगपती  मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीत धमकीचे पत्र मिळाले होते. जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने या प्रकऱणाची जबाबदारी घेतली होती. त्याच्या संबध तिहार कारागृहाशी जोडला जात आहे. याप्रकरणी दिली पोलिसांनी एका दहशतवाद्याचा मोबाइल जप्त केला आहे.

इंडियन मुज्जाहिदीन या संघटनेसाठी काम करीत असलेला दहशतवादी तहसीन अख्तर उर्फ सोनू हा सध्या तिहार जेलमध्ये आहे. त्याच्याजवळ मोबाइल सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून हा मोबाइल जप्त केला आहे. तिहार कारागृहातील बराक आठमध्ये हे दहशतवादी आहेत. दिल्ली पोलिसांना संशय आहे की हे दहशतवादी मोबाइलच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनेल चालवून दहशतवादी कारवाया करीत आहेत. बाहेर दहशतवादी कारवाया केल्याचा दावा ते या माध्यमातून करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.  

गोपनीय माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तिहार कारागृहात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. तहसीन अख्तर उर्फ सोनू जवळील फोन आता न्याय वैद्यक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. उद्योगपती  मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीत धमकीचे पत्र मिळाले होते.  जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने या प्रकऱणाची जबाबदारी घेतली होती. त्याच्या संबध तिहार कारागृहाशी जोडला जात आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आहे. याबाबतच्या तपासासाठी काल दिल्ली पोलिसांनी तिहार कारागृहात छापा मारला. त्यांनी तिहार कारागृहाचे अधिकारी संदीप गोयल यांच्याकडून याबाबतची माहिती घेतली आहे.  

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीचे मालक  मनसुख हिरेन याच्या मृत्यूप्रकरणी एटीएस तपास करीत आहे. ता. १०, आणि ११ मार्चच्या राञी एटीएसच्या पथकाने मुंब्रा रेतीबंदर येथे 'क्राइम सीन'चे प्रात्याक्षिक केले. यावेळी एटीएसचे अधिकारी आणि न्यायवैद्यक प्रयोग शाळेचे अधिकारीही उपस्थित होते.
 
मनसूख यांनी आत्महत्या केली त्यादिवशी (ता. ४ व ५) भरती आणि ओहटीची वेळ काय होती, याचा तपास करण्यात येत आहे.  ता. १० आणि ११ मार्चच्या मध्यराञी भरती आणि ओहटीची वेळ सारखी असल्याने एटीसच्या पोलिसांनी या दिवशी 'क्राइम सीन' चे प्रात्याक्षिक केल्याचं समजते. मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा व ठाणे येथील मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या घटनेचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे. मनसुख यांची आत्महत्या कि हत्या याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख