देशाने पहिल्यांदाच पोलिस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री 'हप्ता वसूली' करताना पाहिले!

देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय (CBI) अॅक्शन मोडवर आली आहे
 Sachin Waze, Anil Deshmukh .jpg
Sachin Waze, Anil Deshmukh .jpg

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या (राष्ट्रीय तापस यंत्रणा) ताब्यात आहे. त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या हफ्ते वसुलीचा केलेला आरोप. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या सर्व आरोपांची सीबीआय चौकशी लावल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावरुन केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

जावडेकर यांनी एक ट्वीट करत म्हटले आहे की ''अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचे पितळ उघडे पडले. देशाने पहिल्यांदाच पोलिस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री 'हप्ता वसूली' करताना पाहिले''. अशा शब्दाच जावडेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. 

 
दरम्यान, देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय (CBI) अॅक्शन मोडवर आली आहे. या आरोपांच्या चौकशीसाठी दिल्लीचे सीबीआय पथक मुंबईत दाखल झाले आहे. लवकरच चौकशीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळल्यास सीबीआय (CBI) गुन्हा दाखल करु शकते, असे न्यायालयाने सांगितले आहे. ही चौकशी येत्या पंधरा दिवसात करावयाची असल्याने हे दिवस आता देशमुख यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. 

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेला (Sachin Waze) प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना (Sachin Waze) निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केला होता. 

राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी काल रात्री उशिरा ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी सुप्रीम कोर्टात इ फायलिंग द्वारा याचिका दाखल करण्यात येणार आहे.

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com