मोठी बातमी : काबूल हल्ल्याचा सूत्रधार ठार! अमेरिकेचे प्रत्युत्तर

आयसिसने केलेल्या या हल्ल्याला आता अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आहे.
Sarkarnama (30).jpg
Sarkarnama (30).jpg

काबुल : काबुल विमानतळ गुरुवारी तीन बॉम्ब स्फोटांमुळे हादरुन गेलं होतं. या स्फोटात शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अमेरिकेच्या 13 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.  आता त्यापेक्षाही अधिक मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याचं वृत्त आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे या हल्ल्याची शक्यता लक्षात घेता अमेरिकेने काबुल विमानतळाची सुरक्षा अधिक कडक केली आहे. गुरुवारी आयसिसने केलेल्या या हल्ल्याला आता अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आहे. 

अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या बॉम्ब स्फोटांमुळे अमेरिकेच्या 13 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला असून या स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासन)  या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. हा दहशतवादी गट तालिबानचा कट्टर विरोधक असल्याचं मानलं जाते.  आयसिसने केलेल्या या हल्ल्याला आता अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आहे. अफगाणिस्तानमधील आयसीसच्या तळांवर अमेरिकेने ड्रोनच्या माध्यमातून बॉम्बचा वर्षाव केला आहे. 

मोदींना बाबूंनी बिघडवलं..त्यांना अन्सारी प्रिय वाटतो, तोगडिया आवडत नाही! 
अमेरिकेच्या या हल्ल्यात काबुल हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही या हल्लेखोरांना माफी करणार नाही, या हल्लाला जशास तसं उत्तर देणार आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केलं होतं. काबुल हल्ल्यानंतर अमेरिकेवर मोठा दबाव होता. अमेरिकेचे तेरा सैनिक शहीद झाले आहेत. या जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ठरवलं होतं.  हल्ला करणाऱ्यांना शोधून मारले जाईल, असा गर्भित इशाराच त्यांनी दिला होता. तर दुसरीकडे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष असतो तर काबूलवर हल्ला झालाच नसता, असा दावा केला आहे.  

देशाला उद्देशून भाषण करताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या अमेरिकी सैनिकांना आदरांजली वाहत ते म्हणाले, हा हल्ला कधीच होऊ द्यायला नको होता. मी जर राष्ट्रपती असतो तर हा हल्ला होऊच दिला नसता. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटूंबियांसोबत आम्ही आहोत. या घटनेनं आपली दु:ख अधिकच गडद झालं आहे. देवच अमेरिकेचं भलं करेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com