राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा.. 

आदित्य ठाकरे यांनी आमदार मोहिते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-29T143911.677.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-29T143911.677.jpg

पुणे  : खेड पंचायत समितीच्या सभापतींच्या अविश्‍वास ठरावावरुन शिवसेना राष्ट्रवादीमध्ये राडा सुरु असतानाच, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते Dilip Mohite यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी आमदार मोहिते यांना ट्वीटरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. Aditya Thackeray wishes NCP MLA Dilip Mohite

राज्यात महाविकास आघाडी असताना देखील पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेतून विस्तव देखील जात नाही. याचा प्रत्यय खेड पंचायत समितीच्या सभापतींच्या विरोधात शिवसेनेच्या सदस्यांसह राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अविश्‍वास ठराव आणला. यामुळे संतप्त झालेल्या सभापती भगवान पोखरकर यांनी सदस्य ठेवण्यात आलेल्या सिंहगड परिसरातील रिसॉर्टवर राडा करत, काही सदस्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. त्याविरोधात त्यांच्‍यावर गुन्हा दाखल होऊन अटक देखील झाली.

या प्रकरणात आमदार दिलीप मोहिते आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. पोखरकर यांनी केलेल्या हल्ला हा आढळराव यांच्या सांगण्यावरुनच झाल्याचा आरोप मोहिते यांनी केला. तर मोहिते हे गुंडप्रवृत्तीचे असून, खेड तालुक्याला लागलेली काळी बुरशी आहे. असा प्रत्यारोप आढळराव पाटील यांनी केला.

हा वाद शिवसेना आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसह मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचला असतानाच, आमदार मोहिते यांच्या आजच्या (ता. २९) वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमदार मोहिते यांना ट्वीटरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान ‘‘माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अतिशय खोटारडे असून, ‘सौ चूहे खाकी बिल्ली चली हज को’ अशी त्यांची भूमिका असते. मी जर खेड सभापतींच्या मारहाण नाट्यामागे असेल; तर त्यांनी पत्रकारांना सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना सांगावे आणि माझी शक्य तेवढी उच्च पातळीवर चौकशी करावी. मात्र, त्या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही; तर त्यांनी तोंडाला काळे फासून खेड तालुक्यात यावे,’’ असे आव्हान आमदार मोहिते यांनी दिले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com