अभिनेत्री दिपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात पोचली, सारा, श्रद्धा कपूरही येणार ! 

अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्‍न पुढे येत आहेत.
अभिनेत्री दिपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात पोचली, सारा, श्रद्धा कपूरही येणार ! 

मुंबई : ड्रग प्रकारणातल्या चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण साडेसहा दहा मिनिटे असताना म्हणजेच 10.20 ला नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोच्या गेस्ट हाउसला पोचली. वास्तविक तिने माध्यम प्रतिनिधींना टाळायचे होते. त्यामुळे तिने तसा चकवा पत्रकारांना देण्याचा प्रयत्न केला पण, काही प्रतिनिधींनी तिला गाठण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तिला तातडीने कार्यालयात घेतले. 

अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्‍न पुढे येत आहेत. बॉलिवूडमधील घराणेशाहीने त्याचा बळी गेल्याचा खळबळजनक आरोप अभिनेत्री कंगना रानावत हिने केला आहे. तसेच बॉलीवूडला गटार म्हणण्याबरोबरच मुंबई पीओक म्हणण्यापर्यंत कंगनाची मजल गेली होती. टीका करताना तिला आपण काय बोलतो आहोत याचे भानही राहिले नाही. 

मुंबईला पीओक म्हटल्यानंतर शिवसेनेने तिच्यावर सडकून टीका केली होती. शिवसेना विरूद्ध कंगना असा सामनाही रंगल्याचे दिसून आले. तसेच सुशांत ड्रग्जच्या आहारी गेल्याचेही पुढे आले. बॉलीवूडमध्ये डग्ज घेणारे अनेक कलाकार आहेत आणि त्यांच्या ड्रग्जशिवाय पार्टी होत नाहीत असे आरोप आणि व्हिडिओही पुढे आले आहेत. त्यामुळे एनसीबी काही अभिनेत्रींची चौकशी करीत आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता दिपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात पोचली आहे तिची किती तास चौकशी होते हे पाहावे लागले. मात्र दिपिकापाठोपाठ आता सारा अली खानही या कार्यालयात पोचत आहे. 

प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या या दोन अभिनेत्री एनसीबी कार्यालयात पोचत असल्याने माध्यमांच्या प्रतिनिधीनी एनसीबी कार्यालयाजवळ गर्दी केली होती. श्रद्धा कपूरही या कार्यालयात जाणार आहे. 

दिपिका पदुकोण ड्रग्जप्रकरणी अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. एनसीबी कार्यालयाजवळ मोठा पोलीस पहारा या ठिकाणी लावण्यात आलाय, दिपीककला आज 3 अधिकाऱ्यांच्या समोर बसून प्रश्न विचारले जाणार आहेत तर मॅनेजर करिष्मासोबतही बसवून समोरासमिर चौकशी केली जाणार आहे. तसेच आणखी दोन तीन वेळा चौकशी होऊ शकते असेही समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com