अभिनेता सोनू सूद अडचणीत येणार?  

अभिनेता सोनू सूदच्या प्रकरणात रेमडेसिव्हिरचा पुरवठा करणारी मोठी साखळी होती.
 Actor Sonu Sud .jpg
Actor Sonu Sud .jpg

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन जास्त किंमत देऊन सुद्धा रुग्णांना मिळाले नाही. त्यातच काही अभिनेते आणि आमदार यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन रुग्णांनाच्या नेतवाईकांना उपलब्ध करुन दिली होती. मात्र, सरकारकडे उपलब्ध नसलेले औषध अभिनेते व आमदार यांच्याकडे उपसब्ध होत असल्यामुळे त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यावर आज (ता.१६ जून) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.  (Actor Sonu Sud likely to get into trouble in Remdesivir case) 

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांना रेमडेसिव्हिरचा अवैध पुरवठा प्रकरणात संबंधित ट्रस्ट, ट्रस्टींच्या विरोधात माझगाव न्यायलयात फौजदारी तक्रार दाखल, करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची मुंबई उच्च न्यायालयात दिली.

तसेच बीडीआर फाऊंडेशन ट्रस्ट आणि या ट्रस्टचे ट्रस्टी धीर शहा आणि या ट्रस्टला रेमडेसिव्हिरचा पुरवठा करणाऱ्या बीडीआर फार्मास्युटिकल्सच्या चार संचालकांविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे, सिद्दिकी यांच्याविरोधात अद्याप तक्रार दाखल केलेली नाही, असेही कुंभकोणीं यांनी सांगितले.

अभिनेता सोनू सूदच्या प्रकरणात रेमडेसिव्हिरचा पुरवठा करणारी मोठी साखळी होती. शेवटी ज्या दुकानाने पुरवठा केला ते दुकान गोरेगावमधील लाईफलाईन मेडिकल केअर हॉस्पिटलमधील होते. त्या फार्मसीला सिप्ला कंपनीने भिवंडीमधून पुरवठा केला होता. सिप्लाकडे अधिक चौकशी सुरू, असल्याची माहीती कुंभकोणी यांनी दिली आहे.

सेलिब्रिटी स्वत:ला मसीहा म्हणून दाखवत कथित गरजूंना पुरवठा करतात, तेव्हा रेमडेसिव्हिर बनावट आहे की खरे, याची तरी खातरजमा करतात का? कोणीही उठून सोशल मीडियावर मोहीम सुरू करतो! यामुळे नागरिकांचा सरकारविषयीही गैरसमज होत असेल, असे निरीक्षण न्या. एस. पी. देशमुख व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com