सुशांत सिंह राजपूत प्रमाणे मोहित रैनाचाही मृत्यू होऊ शकतो..?

मोहितच्या जीवाला धोका आहे, "सेव्ह मोहित"
Sarkarnaa Banner (1).jpg
Sarkarnaa Banner (1).jpg

मुंबई : दूरचित्रवाणीवरील 'देवो के देव महादेव' मालिका, 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपट आणि 'भौकाल' 'काफिर' या वेब सीरिजमधून बॅालिवुडमध्ये प्रकाश झोतात आलेला प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित रैनाबद्दल Mohit Raina एक धक्कादायक दावा करण्यात आला होता. याबाबत मोहित रैनाने चार जणांविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. Actor Mohit Raina complaint against four persons

काही दिवसापूर्वी मोहित रैनाबाबत सारा शर्मा हिने सोशल मीडियावर "सेव्ह मोहित" ही मोहीम चालविली होती. सारा शर्मा हिच्या म्हणण्यानुसार अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणे मोहित रैनाच्या मृत्यू होऊ शकतो. मोहितच्या जीवाला धोका आहे, अशी "सेव्ह मोहित" अशी मोहीम साराने सोशल मीडियावर चालविली होती. त्यानंतर मोहित रैना याने आपल्या कुंटुबियासमवेत समोर येऊन आपण सुरक्षित आणि फिट अॅण्ड फाइन आहोत, अशी माहिती दिली होती.  
 
या घटनेनंतर मोहितने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार बोरिवली न्यायालयाने संबधित पोलिसांना मोहितचा जबाब नोंदवून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी मोहितचा जबाब नोंदविला आहे. सारा शर्मा आणि तिच्यासोबत परवीन शर्मा, आशिव शर्मा, मिथीलेश तिवारी यांनी आपल्याला ञास दिल्याचे रैना यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

रैना यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारी कट रचने, पोलिसांना चुकीची माहिती देणे,  धमकी देणे आणि खंडणी मागितल्याप्रकरणी या चैाघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी अधिक तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत.
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com