अभिनेते दिलीप ताहील यांच्या मुलाला ड्रग्सप्रकरणी अटक 

ध्रुव ताहील (Dhruv Tahil) एका पेडलर्सच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडून वारंवार ड्रग्सची मागणी केली जात होती.
 Actor Dilip Tahil's son arrested in drug case .jpg
Actor Dilip Tahil's son arrested in drug case .jpg

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहील (Dilip Tahil) यांचा मुलगा ध्रुव याला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. तो ड्रग्स (drug) विक्रेत्याच्या संपर्कात असल्याचे व्हॉट्सॲप चॅटवरून स्पष्ट झाले आहे. (Actor Dilip Tahil's son arrested in drug case)

एका ड्रग्स पेडलर्सच्या अटकेनंतर एएनसीने मोठी कारवाई केली. ध्रुव ताहील (Dhruv Tahil) एका पेडलर्सच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडून वारंवार ड्रग्सची मागणी केली जात होती. त्या बदल्यात त्याने त्याला पैसे दिल्याचे उघड झाले आहे. व्हॉट्सॲप चॅटिंगवरून एएनसीने कारवाई करत ध्रुवला अटक केली. अधिक माहिती देताना एएनसी सूत्रांनी सांगितले की, ३५ ग्रॅम एमडी ड्रग्स प्रकरणात अंमली पदार्थविरोधी पथकाकडून मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक करण्यात आली होती.

त्याचा मोबाईल एएनसीने ताब्यात घेतला असता त्याच्या व्हॉट्सॲपवर ध्रुव ताहील याच्यासोबतचे संभाषण एएनसीच्या हाती लागले. ज्यात ध्रुव वारंवार ड्रग्सची मागणी करत होता. ध्रुवने ड्रग्ससाठी आरोपी मुजमिलच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर केले होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ध्रुवला अटक करण्यात आली. २०१९ ते मार्च २०१९ पर्यंत तो तस्कराच्या संपर्कात होता.  

हे ही वाचा 

मोठी बातमी : `CBI च्या FIR मधील ते दोन परिच्छेद म्हणजे ठाकरे सरकार पाडण्याचा डाव`
 
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केंद्रीय गुप्तचर संस्थेने (CBI) दाखल केलेल्या गुन्ह्यातील (FIR) दोन परिच्छेदांना राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. हे दोन परिच्छेद वगळावेत, यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) पाच मे रोजी अपील केले असून हे दोन परिच्छेद जाणीवपूर्वक फिर्यादित घेणे हा राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचे यात म्हटले आहे. (CBI Files FIR against Anil Deshmukh)

हे दोन परिच्छेद पोलिस बदल्यांच्या संदर्भातील आहेत. वादग्रस्त सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याच्या नियुक्तीबाबत आणि पोलिस बदल्यांमधील कथित हस्तक्षेपाबद्दल आहेत. सचिन वाझे यांना पंधरा वर्षांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्याची आणि त्यांच्याकडे संवेदनशील गुन्हे तपासासाठी असल्याची पूर्व कल्पना देशमुख यांना होती, असे या परिच्छेदातील वाक्य राज्य सरकारला खटकले आहे. देशमुख आणि काही इतरांनी पोलिस बदल्यांमध्ये विनाकारण हस्तक्षेप केला, हे दुसरे वाक्यही राज्य सरकारच्या पसंतीस उतरले नाही. 

या संबंधातील परिच्छेदाबद्दल राज्य सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त  परमबीरसिंग यांनी शंभर कोटी रुपयांच्या हप्तेबाजीचा आरोप केला होता. त्याविरोधात चौकशी करून एफआयआर दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता. हा गुन्हा 21 एप्रिल रोजी दाखल झाला. तो दाखल करताना सीबीआयने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत या संबंधात नसलेल्या बाबीही एफआयआरमध्ये दाखल केल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. त्याबद्दल तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच सत्तेबाहेर असलेले काही राजकीय गट यांच्या सोयीसाठी हे केल्याचे म्हणत अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. यात थेट भाजपचे नाव नसले तरी `सत्तेबाहेर असलेले राजकीय गट` असा उल्लेख त्यात आहे.  

`सीबीआयने हे नकळत केले नसून अतिशय कावेबाजपणे दृष्टहेतून हे परिच्छेद टाकल्याचा आरोप यात सरकारने केला आहे. राज्य सरकारच्या प्रशासनात हस्तक्षेप करत आणि काहीजणांना अडकविण्यासाठीचा हा उद्योग हा सत्तेबाहेरील गटाला साथ देण्यासाठी आणि राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी केले आहे, असे याचिकेतील हे स्पष्ट वाक्य आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com