मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबद्दल 29 स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई - action against twenty nine fare price shops kailas pagare says | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबद्दल 29 स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 जुलै 2020

अन्नधान्य तसेच गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याकरीता प्रधान कार्यालय तसेच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालय अधिनस्त शिधावाटप कार्यालयांतर्गत एकूण 44 दक्षता पथके गठीत करण्यात आलेली आहेत.

मुंबई : मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात दक्षता पथकाकडून गैरप्रकार करणाऱ्या 29  स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.

मुंबई - ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या ए पी एल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य तसेच गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याकरीता प्रधान कार्यालय तसेच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालय अधिनस्त शिधावाटप कार्यालयांतर्गत एकूण 44 दक्षता पथके गठीत करण्यात आलेली आहेत. या दक्षता पथकामार्फत लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत आतापर्यंत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

1) एकूण 13 शिधावाटप दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.  

2) एकूण 4 शिधावटप दुकाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

3) एकूण 12 शिधावाटप दुकानांवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

4) प्रधान कार्यालयाच्या फिरते पथकामार्फत 3 ठिकाणी धाडी टाकून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करुन जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांसाठी इस्लामपुरात आंदोलन 

पुणे: रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी आज इस्लामपूर (जि. सांगली) येथे 'राज्यव्यापी शेतकरी बचाव आंदोलन' केले. रयत क्रांती संघटनेच्यावतीने हे आंदोलन राज्यभर करण्यात आल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

यावेळी खोत यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले. "महाराष्ट्रातील शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेने आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने केली व पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.  शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती व्यापक अशी बैठक राज्याचे मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री यांनी घेणे अगत्याचे होते. आपत्तीच्या कालखंडापासून शेतकऱ्यांच्या समस्याकडे
लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नसणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.  रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून खालील प्रश्नावरती सरकारला वेळोवेळी जाणीव करून देण्याचे काम केलेले आहे. पण सरकार लक्ष देत नसल्याने अशा आपत्तीच्या काळात नाईलाजाने रयत क्रांती संघटनेला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे" असे सदाभाऊ खोत म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख