मोठी बातमी : मनसुख हिरेनच्या हत्येसाठी 45 लाखांची सुपारी; NIA चा दावा     

आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मागणी तपास यंत्रणेने केली आहे.
 45 lakh betel nut for killing Mansukh Hiren .jpg
45 lakh betel nut for killing Mansukh Hiren .jpg

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरेन  (Mansukh Hiren) याच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करीत आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. (45 lakh betel nut for killing Mansukh Hiren) 

ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन याची हत्या करण्यासाठी 45 लाख रुपयांची सुपारी दिली गेली होती. असा दावा  एनआयएने मंगळवारी विशेष न्यायालयात केला आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मागणी तपास यंत्रणेने केली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपींना हत्येसाठी 45 लाखांची सुपारी दिली होती. 

अँटिलिया स्फोटक प्रकरणात हिरेन महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक झालेले आरोपी अत्यंत खतरनाक असल्याचे एनआयएचे वकील सुनील गोन्साल्विस यांनी न्यायालयात सांगितले. 4 ते 5 साक्षीदारांना धमकी दिली गेली आहे. त्यामुळे ते पुढे येत नाहीत, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, असा दावाही वकिलांनी केला.   

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. सतीश आणि मनिष यांनी हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली आहे. हिरेन यांच्या हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क केला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना पैसे देण्यात आले होते. असा दावा एनआयएच्या वकिलांनी जून महिन्यात केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com