रायगडमध्ये दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू, माळीणची पूनरावृत्ती होण्याचा धोका 

तर अजून 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 32 killed in Raigad landslide .jpg
32 killed in Raigad landslide .jpg

रायगड : मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून (Raigad Landslide) तब्बल 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. महाड तालुक्यातील तळई गावात (Talai Village) ही भीषण दुर्घटना घडली आहे. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.  (32killed in Raigad landslide) 

आठवड्याभरापासून महाडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. गुरुवारी ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई हे गाव डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 ते ४० घरे दबली गेली आहेत. दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर अजून 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या मुसळधार पाउस सुरु असल्यामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.

दरम्यान, राज्यात मुसळधार पावसाने काल (गुरुवारी) हाहाकार माजवला. रायगड, चिपळून, महाड आशा अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पूरात अडकलेले आहेत. कित्येक भागांमध्ये दरडी कोसळल्याने मार्ग बंद झालेले आहेत. पूरात अडकेलेले नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असून, प्रशासनाकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहे. आज (ता. २३ जूलै ) पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. तर,पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिस कंट्रोल रूमकडून मिळाली आहे. 

पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दरड कोसळ्यामुळे आणि अनेक रस्ते पाण्यासाठी असल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यास अडणी निर्माण होत आहेत. मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव्र आणि गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने कालपासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी आपली जनावरे, महत्त्वाच्या वस्तू घेऊन स्थलांतरीत व्हावे असे, आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com