30 bjp workers died while giving servic in corona pandemic in Mumbai says lodha | Sarkarnama

कोरोना काळात सेवा करताना भाजपचे 30 कार्यकर्ते मृत्युमुखी : लोढा

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 17 जुलै 2020

केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरातच या कोरोना संकटात ‘आरएसएस’ सर्व शक्तिनिशी मदत कार्य करत आहे. ही मंडळी कधीही श्रेयासाठी काम करत नाहीत, असे लोढा म्हणाले आहेत.

मुंबई : कोरोनाच्या काळात सेवा करताना मुंबईत भाजपचे ३० कार्यकर्ते कोरोनामुळे मृत्यू पावले, असा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केला. धारावी झोपडपट्टीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. त्यात लोढा यांनी उडी घेत भाजप कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने काम केल्याचे सांगितले.  

सेवाकार्यात जनकल्याण समिती, सेवांकुर, निरामय फाउंडेशन, स्वामीनारायण संप्रदाय, अनिरुद्ध बापूंची संस्था, नानासाहेब धर्माधिकारींची संस्था, पांडुरंगशास्त्री आठवलेंची संस्था, नरेंद्र महाराजांचा संप्रदाय, रोटरी आणि लायन्स क्‍लबचे लोक, श्री राजचंद्रजी संस्थान, जियो जीतो संस्था तसेच अनेक जैन संघटना आहेत. मुंबईत संघाच्या स्वयंसेवकांनी जवळपास एक लाख २२ हजार नागरिकांचे स्क्रिनिंग पूर्ण केले आहे. या संस्थांच्या कामाचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे, असेही लोढा यांनी म्हटले आहे.
धारावी कोरोनामुक्त करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा वाटा आहे का, या वादात मंगलप्रभात लोढा यांनीही संघाची बाजू घेतली असून दुसऱ्याचे श्रेय लपवणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली.

संघ श्रेयासाठी काम करत नाही

राज्य कोरोनाच्या विळख्यात असताना दाट लोकवस्तीची धारावी कोरोनामुक्त करणे हे सोपे काम नव्हते. या कामात अनेक सामाजिक, धार्मिक संस्थांची मदत झाली आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरातच या कोरोना संकटात ‘आरएसएस’ सर्व शक्तिनिशी मदत कार्य करत आहे. ही मंडळी कधीही श्रेयासाठी काम करत नाहीत, असे लोढा म्हणाले आहेत.

हे पण वाचा :  45 टक्के लोकांचा घरीच उपचाराचा निर्णय

कोरोना बाधित 10,366 मुंबईकर होम क्वारंटाईन असून त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. तर 9,771 रुग्ण हे विविध रुग्णांलयात उपचार घेत आहेत. सौम्य लक्षणे असलेले 2,691 रुग्णांना जम्बो कोव्हिड फॅसिलिटी सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईत 22,828 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यातील 45 टक्के लोकांनी घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अंधेरीतील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दांम्पत्याने सांगितले की, आम्ही रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेणे पसंत केले. रुग्णालयांतील वातावरणाबाबत साशंकता असून मनात थोडी भीती होती. शिवाय आम्हा दोघांना ही वेगवेगळे राहायचे नसल्याने आम्ही होम क्वारंटाईन होण्याचे ठरवले. अशा प्रकारे अधिकतर रुग्ण होम क्वारंटाईन असल्याचे समोर आले आहे.

अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या संस्थेत काम करणारे हे दाम्पत्य असून त्यांना कामानिमित्त नेहमी घराबाहेर जावे लागत होते. त्यामूळे कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता त्यांना ही वाटत होती. त्यामुळे त्यांनी एप्रिल मध्ये प्लस ऑक्‍सिमिटर, थर्मामिटर, बीपी मोनिटरिंग मशीन विकत घेतल्याचे ही ते सांगतात. तीन आठवड्यांपूर्वी ते दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर सुरुवातीचे तीन दिवर सतत ते आपल्या शरीरातील ऑक्‍सिजनची पातळी तपासात असल्याचे सांगतात. त्यांची लक्षणे ही सौम्य प्रकारची होती. आठवड्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊन त्यांना पूर्वीपेक्षा बरे वाटू लागले. त्या दरम्यान त्यांनी व्हीडीओ कॉल च्या माध्यमातून डॉक्‍टरांशी संपर्क सुरू ठेवला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख