कोरोना झालेल्या नोकरदारांना मिळणार २८ दिवसांची पगारी रजा... - 28 days paid leave employees suffering from corona up government order | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कोरोना झालेल्या नोकरदारांना मिळणार २८ दिवसांची पगारी रजा...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

नोकरदार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली तर त्यांना २८ दिवसाची पगारी रजा paid leave मिळणार आहे.

लखनऊ : देशभर कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. उत्तर प्रदेश सरकारने नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.  नोकरदार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली तर त्यांना २८ दिवसाची पगारी रजा paid leave मिळणार आहे. याबाबतचा आदेश उत्तर प्रदेश सरकारने काढला आहे.

ज्या दुकान किंवा कंपनीमध्ये १० पेक्षा जास्त व्यक्ती काम करीत आहे, अशा ठिकाणी कोरोनाच्या उपाययोजना मुख्य दरवाज्याजवळ लावण्यास सांगितले आहे. कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना २८ दिवसांची पगारी रजा संबधित प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. कोरोना काळात ज्या कंपन्या बंद पडल्या आहेत तेथील कर्मचाऱ्यांना सुटीसोबत वेतनभत्ते देण्यात यावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. खासगी आणि सरकारी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश मंत्रीमंडळाने १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरणास परवानगी दिल्याबाबत योगी आदित्यनाथ यांनी मोदींचे आभार मानले.  उत्तर प्रदेशामध्ये कोरोना रोखण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावरून सांगितले. 

''मंत्रिमंडळ बैठकीत उत्तर प्रदेशातील १८ वर्षाच्या पुढील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा हरेल आणि भारत जिंकेल,'' असे टि्वट योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.  योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ते सध्या विलगीकरणात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मंत्रीमंडळाच्या बैठकीस उपस्थित होते. 

उत्तर प्रदेशमध्ये वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नसणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख