मुंबईत पावसाचा हाहाकार; चेंबूरमध्ये दरड कोसळून १५ ठार   - 15 killed in Chembur landslide  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मुंबईत पावसाचा हाहाकार; चेंबूरमध्ये दरड कोसळून १५ ठार  

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 18 जुलै 2021

बचावकार्य अजूनही सुरू असून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai) शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. मात्र, चेंबूरमध्ये पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे दरड भिंतीवर कोसळल्यामुळे ही भिंतच घरांवर कोसळली. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा अकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (15 killed in Chembur landslide) 

या घटनेत आत्तापर्यंत ६ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा : शिवसेनेची खासदार कोल्हेंवर कडवट टीका : सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका

चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये ही घडना घडली. मध्यरात्री हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केले. बचाव यंत्रणेला देखली त्याचवेळी माहिती देण्यात आली. माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. पावसाचे प्रमाण सकाळी कमी झाले असले, तरी पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. या चिखलामुळे बचावकार्य करण्यात एनडीआरएफच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. डोंगरामुळे नेहमीच या भागातील अशा दुर्घटनेची शंका उपस्थित केली जात होती. पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत ५ ते ८ घरांवर कोसळली आणि मलब्याखाली घरांमध्ये राहणारे लोक दबले. 

हेही वाचा : पहिल्याच भेटीत गृहमंत्री वळसे पाटलांच्या पोलिसांना कानपिचक्या

एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, या भागामध्ये ५० मीटरच्या अंतरावरच दोन घटना घडल्या आहेत. यामध्ये एका घटनेत दरड कोसळली असून दुसरीकडे बीएआरसीची भिंत कोसळली. दोन्ही घटनांमध्ये आत्तापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जणांचा वाचवण्यात यश आले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख