कॅन्सरग्रस्तच्या नातेवाईकांचा मुंबईत राहण्याचा प्रश्न मिटला; शरद पवार यांच्या हस्ते सदनिकांचे लोकार्पण

कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे 100 फ्लॅट टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत.
 Sharad Pawar, Jitendra Awhad .jpg
Sharad Pawar, Jitendra Awhad .jpg

मुंबई : मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात (Tata Cancer Hospital) देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांच्या संकल्पनेतून 'म्हाडा'ने त्यांचे 100  फ्लॅट टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांना हे फ्लॅट सुपूर्द करण्यात आले. (100 flats donated by MHADA to Tata Cancer Hospital)

त्या संदर्भात आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. ते म्हणाले की आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 खोल्या सुपूर्द केल्या. माणुसकी धर्माला शोभेल असा हा कार्यक्रम आज पार पडला. खासकरून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत या उपक्रमाला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!, आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आव्हाड यांना या प्लॅट्स बद्दल विचारले होते, त्यांनी ट्वीट करुन  तो प्रसंग सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की ''काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला... कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झाले. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला. मी म्हटले आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात, पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत, त्याप्रमाणे आज हा कार्यक्रम पार पडला आहे. 

कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे 100 फ्लॅट टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत. पुढे ही संख्या 200 होईल. फ्लॅट देण्याचा विचार आणि निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया 7 दिवसांत झाली याचा गर्व असल्याचे आव्हाड यांनी सांगितले होते. म्हाडाने फ्लॅटच्या चाव्या दिल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही टाटा रुग्णालयाची असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com