एटीएसकडून सचिन वाझेंची १० तास चौकशी, महत्त्वाची माहिती दिली  - 10 hours interrogation of Sachin Waze from ATS, important information given  | Politics Marathi News - Sarkarnama

एटीएसकडून सचिन वाझेंची १० तास चौकशी, महत्त्वाची माहिती दिली 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 मार्च 2021

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक ( एटीएस) ने दहा तास चौकशी केली.

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक ( एटीएस) ने दहा तास चौकशी केली. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंशी काही संबंध नाही, अशी माहिती वाझेंनी एटीएसला दिली असल्याचे समजते. 

महाराष्ट्र एटीएसकडून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझेंच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर सचिन वाझेंची एटीएशने दहा तास चौकशी केली. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत आहेत. या आरोपानंतर वाझे स्वत: हून एटीएसच्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

काय म्हणाले सचिन वाझे? 

'मी ती स्कॉर्पिओ गाडी वापरली नाही. धनंजय गावडेशी माझा काहीही संबंध नाही. मी त्यांना ओळखतही नाही', अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. तसेच वाझे यांनी त्यांच्या गाडीचा एक गाडी पाठलाग करत असून त्याचा नंबर बनावट आहे, असा दावा त्यांनी केला. अशाप्रकारे पाळत ठेवल्याप्रकरणी वाझे एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची भेट घेणार आहेत. 

पुन्हा चौकशीची शक्यता

दरम्यान, सचिन वाझे यांची सोमवारीही चौकशी करण्यात आली. वाझेंना दुपारी एटीएस कार्यालयात बोलावले होते. तिथे त्यांना  20 जिलेटिनसह मिळालेल्या स्कॉर्पियो प्रकरणाविषयी प्रश्न केले गेले. या प्रकरणात वाझे तपास अधिकारी होते.  मनसुख हिरेन यांच्या पत्नीने एपीआय सचिन वाझे यांचे नाव घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एटीएसचे अधिकाऱ्यांकडून त्यांची पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

 

 राज्यातील १६० हवालदार झाले पीएसआय : आता दुसर्या यादीची प्रतीक्षा 

 

सचिन वाझे यांनी त्यांच्या गाडीचा एक गाडी पाठलाग करत असून त्या गाडीचा नंबर बनावट आहे, असा दावा केला. गाडीमध्ये पोलिसांचा बोर्ड लावून गाडीचा पाठलाग होत असल्याचे वाझे म्हणाले. वाझे यांचा पाठलाग करणारी गाडी एटीएसची असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी दावा केल्याप्रमाणे MH 45 7W 4887 ही गाडी त्यांच्या गाडीचा पाठलाग कर होती. मात्र, या गाडीचा नंबर हा बनावट असल्याचे वाझे यांनी म्हटले आहे. 

फातिमाची झाली गीता अन् निघाली नायगावची राधा वाघमारे...
 

गृहमंत्र्यांची घोषणा

सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून दुसऱ्या ठिकाणावर पाठवणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषित केले होते. तर, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली होती. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिस वाझे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भाजपने मंगळवारी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख