‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ शिवसेनेची पंतप्रधानांवर टीका

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ शिवसेनेची पंतप्रधानांवर टीका
4Imran_20Khan.jpg

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ अशी एक मराठी म्हण आहे. बेताल बडबडीसाठी कुप्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ही म्हण तंतोतंत लागू पडते. ‘तालिबानी लोक हे तर सामान्य नागरिक आहेत,’ असा दिव्य विचार इम्रान मियाँनी मांडला आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. 


पोलिस उपायुक्त मॅडमला हवी आहे, चिकण बिर्याणी तीही मोफत 
अमेरिका अफगाणिस्तानातील आपले सर्व सैन्य माघारी घेत आहे आणि तिथे पुन्हा एकदा तालिबानी राजवट येण्याची चिन्हे दिसत असल्याने इम्रान खान यांना तालिबानप्रेमाचे भरते आले असावे. त्यामुळे ‘तालिबानी म्हणजे सर्वसामान्य नागरिक’ असे विधान इम्रान यांनी केले असावे. पण हे वक्तव्य म्हणजे दहशतवाद प्रेमाचा ढळढळीत पुरावा आहे, अत्यंत क्रूर व्हिडीओ जारी करणारे तालिबानी (Taliban) म्हणजे सज्जन नागरिक आहेत, असे इमरान मियाँना वाटत असेल तर पाकड्यांच्या दहशतवादप्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी स्वतःच जगाला दिलाय,असे अग्रलेखात म्हटलं आहे.  

अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका
अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी तालिबान्यांवर स्तुतिसुमने उधळली आणि अमेरिकेच्या चुकांचा पाढा वाचला. अमेरिकेच्या चुका जरूर असतील, परंतु जगभरातील अतिरेकी संघटनांचे आश्रयस्थान असलेल्या आणि दहशतवादाला कायमस्वरूपी रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेच्या चुका दाखविण्याचा नैतिक अधिकार आहे काय, हा खरा प्रश्न आहे, असे सामच्या अग्रलेखात म्हटलं आहे. 
 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in