मुंबईत पावसाचे धुमशान..पाच दिवस  ‘ऑरेंज अलर्ट’ -  Orange Alert more than 200 mm of rainfall in mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत पावसाचे धुमशान..पाच दिवस  ‘ऑरेंज अलर्ट’

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

मुंबईसाठी पुढील पाच दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. 

मुंबई : मुंबईत पुढील पाच दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या आठ तासात मुंबईतील बहुसंख्य  परिसरात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला. मुंबईसाठी पुढील पाच दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ Orange Alertदेण्यात आला आहे. Orange Alert more than 200 mm of rainfall in mumbai

या दरम्यान मुंबईत काही भागात मुसळधार; तर काही भागात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात आज (ता. १९) मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे; तर त्यापुढील तीन दिवस ही स्थिती अशीच कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातही  Konkan, Marathwada, Goa मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात सोमवारी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सध्या मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. कर्नाटक राज्याच्या दिशेने नैर्ऋत्येचे वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून पुढील काही दिवस पाऊस कोसळणार असल्याचे कुलाबा वेधशाळेचे डॉ. जयंता सरकार यांनी सांगितले. मुंबई विविध ६० ठिकाणी महापालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांवर पावसाची नियमित नोंद घेतली जात आहे. आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनादेखील पालिकेच्या विविधा विभागांना देण्यात आल्या आहेत. 

स्वबळाची भाषा बोलणारे काँग्रेस नेते मोदी-पवार भेटीमुळे अचंबित!
मुंबई : काँग्रेस नेत्यांच्या, प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या रोजच्या भूमिका, विधाने आणि इशाऱ्यांमुळे गेल्या काही दिवस काँग्रेसच्या गोटात उत्साह असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना बोलावून काँग्रेसच्या मनात नेमके काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख