मला नोकरी द्या, नाहीतर लग्न करुन द्या : युवकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत, त्यामुळे जॉब मिळणेही कठीण झालं आहे, त्यामुळे मला एकतर जॉब द्यावा अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे
Give me a job or get me married: Youth's letter to CM
Give me a job or get me married: Youth's letter to CM

मुंबई : वाशिममधील युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून एकतर माला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या अशी, अनोखी मागणी केली आहे.

पत्र लिहणाऱ्या युवकाचे नाव गजानन राठोड आहे. या पत्रात गजानननं म्हटलंय की, माझं वय 35 वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही, त्याचं कारण गेल्या 7 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे, परंतु कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही, जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते. 

तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत, त्यामुळे जॉब मिळणेही कठीण झालं आहे, त्यामुळे मला एकतर जॉब द्यावा अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे अशी अजब मागणी गजानन राठेडने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे.

सध्या हे पत्र सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या आधीही अनेकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या व्यथा कळवल्या होत्या, या लहानग्या चिमुकल्यांनीही लिहिलेली पत्र होती, तर काहींची मागणी एकून हसू आवरत नव्हेत. 

असेच एक पत्र बीडमधील तरुणाने मला एक दिवसाचा मुख्यमंत्री कारा, अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यांरींना दोन वर्षापूर्वी लिहिलं होतं, मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या तरुणाने ही मागणी केली होती, तसेच त्याच्या मूळ गावापासून लालबागच्या राजापर्यंत दंडवत घालत पायी यात्राही काढली होती. हा तरुणही त्यावेळी जोरदार चर्चेत आला होता. आता वाशिमच्या युवकाने केलेल्या मागणीचीही जोरदार चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com