आदित्य ठाकरे यांच्या मैत्रीणीसाठी आजचा दिवस आहे खास! - disha patani wishes aditya thackrey on his birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरे यांच्या मैत्रीणीसाठी आजचा दिवस आहे खास!

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 13 जून 2020

आदित्य आणि दिशा यांच्या मैत्रीची चर्चा सर्वत्र असते. 

पुणे : बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पटनी आणि पर्यावरणमंत्री यांच्यातील मैत्रीची चर्चा सर्वत्र सुरू असते. विशेष म्हणजे या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 13 जून रोजी असतो. दिशाने आज आदित्य यांना ट्विटरवरून शुभेछ्चा दिल्या आहेत. इन्स्टास्टोरीवरून आदित्य यांच्यासोबतचे छायाचित्र दिशाने शेअर केले आहे. आदित्य यांनी मात्र अद्याप दिशाला सोशल मिडियातून शुभेच्छा दिलेल्या नाहीत. 

“Happiest b’day @AUThackeray stay the amazing you and keep shining,” अशा शब्दांत ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. हे ट्विट चार तासांत दहा हजारहून अधिक लोकांनी लाइक केले होते. आदित्य यांना शुभेच्छा देताना दिशालाही त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दिशा आणि आदित्य यांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले होते. आदित्य दिशाला सोबत घेऊन गाडी चालवत असल्याचेही छायाचित्रांतून दिसत होते. दिशा हिने मैत्री असलेल्या तरुणांसोबत जेवायला जाण्यास काय हरकत आहे, असे यावर एका मुलाखतीत सांगितले होते. तिचा टायगर श्राॅफसोबतचा फोटो दिसल्यानंतर त्यावरूनही ती ट्रोल झाली होती. 

अवधूत गुप्ते यांनी संगमनेरमध्ये घेतलेल्या मुलाखतीत आदित्य यांची यावरून फिरकी घेतली होती. वडिलांच्या पसंतीची करणार की आईच्या पसंतीची, असा प्रश्न अवधूत यांना विचारला होता. मला अजून काम करायचे आहे, असे उत्तर आदित्य यांनी त्यावर दिले होते. या उत्तराला प्रत्युत्तर देताना आप कुछ बी बोलो.. आप का उत्तर हमें पटनी चाहिये. आप की बात हमें पटनी चाहिये, असे सांगत सांगत हास्याचा स्फोट घडवून आणला होता. त्यावर आदित्य यांनी तुमची `दिशा` चुकली आहे, असे चलाखीने सांगितले. 

आदित्य यांच्याबद्दल या गोष्टी माहीती आहेत?

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीती आहेत काय? आदित्य यांनी आज आपल्या वयाची तीस वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्याकडे पर्यटन आणि राजशिष्टाचारा अशी दोन्ही खाती आहेत.

-वडिल मुख्यमंत्री आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात मुलगा कॅबिनेटमंत्री असे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आदित्य यांच्यामुळे घडत आहे. वडिल उद्धव हे मुख्यमंत्री आणि आदित्य हे पर्यावरणमंत्री अशी दोन्ही पदे एकाच घरात आहेत.
-शिवसेनेचा नेता हे पद संघटनेत महत्त्वाचे मानले जाते. आदित्य यांना वयाच्या 28 व्या वर्षी या पदावर नेमण्यात आले. 

-उद्धव व रश्मी ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेल्या आदित्य यांचे शिक्षण माहीम येथील बाॅम्बे स्काॅटिश स्कूलमधून झाले. त्यांनी सेंड झेवियर काॅळेजमधून बीएची पदवी घेतली आणि के. सी. लाॅ काॅलेजमधून त्यांनी एएएलबी पूर्ण केले.

Image

-आदित्य हे कवी आणि गीतकारही आहेत. त्यांनी इंग्रजीत कविता केल्या आहेत. त्यांचा   'My Thoughts in White and Black' हा कवितासंग्रह 2007 मध्ये प्रकाशि झाला होता. त्यांच्या गाण्यांचा उम्मीद म्हणून अल्बम त्याच वर्षी काढण्यात आला होता. सुरेश वाडकर, शंकर महादेवन, सुनिधी चौहान आदींनी त्यातील गाणी म्हटली होती. शिवसेनाप्रमुख व आदित्य यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या अल्बमचे प्रकाशन झाले होते. वडिलांप्रमाणे त्यांनाही छायाचित्रणाची हौस आहे. पण उद्धव यांना वाइल्ड फोटोग्राफीची जास्त आवड आहे. आदित्य यांना त्याउलट abstract, light and shadow मधील फोटोग्राफीत मजा येते. 

आदित्य यांचे पहिले आंदोलन म्हणजे शिवसेनेची बदनामी करणाऱ्या पुस्तकाविरोधात होते. रोहिंटन मिस्त्री यांनी `सच अ लाॅंग जर्नी`या शिवसेनेची बदनामी करणाऱ्या पुस्तकाचा समावेश मुंबई विद्यापीठाने त्यांच्या यादीत केला होता. त्याविरोधात हे आंदोलन झाले.

-निवडणूक लढणारे आदित्य हे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. मंत्री होणारे दुसरे. कारण त्यांच्या आधी त्यांचे वडिल हे मुख्यमंत्री झाले होते.

-त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये निवडणूक लढवली. युवा सेनाप्रमुख म्हणून त्यांची 2010 मध्ये नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2017 मध्ये मुंबई जिल्हा फुटबाॅल संघटनेचे ते अध्यक्ष झाले. 2020 मध्ये ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बनले.

-निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार तीस वर्षीय आदित्य हे 16.50 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालकी आहेत. त्यातील साडेचार कोटी रुपयांच्या चार स्थावर मालमत्ता त्यांचे वडील उद्धव यांनी एकाच दिवशी म्हणजे 8 एप्रिल 2013 रोजी भेट दिलेल्या होत्या.

- अभिनेत्री दिशा पटनी हिच्यासोबत लंचला गेल्याचा आदित्य यांचा फोटो सोशल मिडियात बराच गाजला होता. लोकसभा निवडणूक काळात त्यांचे बरेच फोटो विरोधकांनी चर्चेत आणले होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख