विधी शाखेची परीक्षा घ्यावी; बार कौन्सिलचा ठराव - Bar Council Resolves to Take Law Examinations | Politics Marathi News - Sarkarnama

विधी शाखेची परीक्षा घ्यावी; बार कौन्सिलचा ठराव

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 जून 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर विविध व्यावसायिक नियमन परिषदांनी परीक्षा घेण्याबाबत निवेदने दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षा न घेण्याची मागणी सरकारकडे लावून धरली आहे.

मुंबई  : राज्यातील विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा न घेता सरासरी गुणांच्या आधारे मूल्यांकन करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. अद्याप याबाबत अध्यादेश जारी न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढू लागला आहे. वैद्यकीय शिक्षण परिषद, आर्किटेक्‍चर परिषद यांच्या पाठोपाठ आता बार कौन्सिल ऑफ इंडियानेही परीक्षा घेण्याबाबत ठराव केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर विविध व्यावसायिक नियमन परिषदांनी परीक्षा घेण्याबाबत निवेदने दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षा न घेण्याची मागणी सरकारकडे लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने विधीच्या तीन व पाच वर्षे अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, अशी विनंती केली आहे. 

ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी. काही कारणांमुळे ऑनलाईन परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने अन्य पर्यायांचा विचार करावा, असे बार कौन्सिलने म्हटले आहे. अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, असेही बार कौन्सिलच्या पत्रकात म्हटले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख