मनसे विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिल्यास स्वीकारणार!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकारणाची सुरवात भारतीय विद्यार्थी संघटनेपासून झाली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव अमित यांनीदेखील मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी जबाबदारी दिली तरच स्वीकारू, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
Amit Thakre
Amit Thakre

 नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकारणाची सुरवात भारतीय विद्यार्थी संघटनेपासून झाली. (Raj Thakre starts his politics from students Organization) त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव अमित यांनीदेखील मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. (Amit Thakre also ready to except organizational responsiblity) मात्र, राज ठाकरे (Raj Thakre) यांनी जबाबदारी दिली तरच स्वीकारू, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. 

राजकारणाची बाराखडी शिकत आता मुख्य प्रवाहात येण्याची तयारी करणारे अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर प्रथमच माध्यमांसमोर त्यांनी औपचारिक गप्पा मारल्या. नाशिक दौऱ्यावर आलेले अमित यांनी शनिवारी सकाळी मनसेच्या राजगड कार्यालयाला भेट दिली. 

अमित ठाकरे यांनी शहरातील सहा विभाग प्रमुखांशी चर्चा करताना प्रभागनिहाय माहिती जाणून घेतली. मनसेची सत्ता असताना चाळीस नगरसेवक होते. सत्ता संपुष्टात येत असताना एक-एक करून ३० ते ३५ नगरसेवकांनी अन्य पक्षांमध्ये प्रवेश केला. २०१७ च्या निवडणुकीमध्ये मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले. मागच्या टर्ममध्ये निवडून आलेल्या चाळीस मनसे नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये सध्याची राजकीय, विकासकामांची परिस्थिती अमित ठाकरे यांनी जाणून घेतली. 

त्यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या निमित्ताने तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, राजदूत म्हणून ते मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे, भविष्यातील कामे नागरिकांपर्यंत पोचविणार आहे. 

जबाबदारी स्वीकारण्यास तयार 
मनविसेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर अमित यांना माध्यमांनी विचारले असता मनविसेचा प्रदेशाध्यक्ष होण्यास आवडेल, माझे नाव या पदासाठी घेतले जात असल्याने मला आनंद आहे. मात्र, राज ठाकरे यांनी जबाबदारी दिली तरच स्वीकारेल अशी भूमिका घेतली. 

महापालिका निवडणुकीत सक्रिय 
पुढील वर्षी नाशिक महापालिकेबरोबरच राज्यातील १३ ते १४ महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांमध्ये मनसे संपूर्ण ताकदीने उतरणार असून, निवडणुकीची सर्व सूत्रे अमित ठाकरे यांच्याकडे येण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक तयारीचा भाग म्हणून नाशिकमध्ये दर महिन्याला येऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

भाजपने इंधनाचे दर कमी करावे 
मनसेने परप्रांतीयांचा मुद्दा बाजूला केल्यास भाजप- मनसे युती शक्य असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यावर कोटी करताना मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी भाजपने इंधनाचे दर कमी केले तरच मनसे युतीचा विचार करेल, असे वक्तव्य करत पाटील यांच्यावर शेलक्या भाषेत पलटवार केला. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com