Opposition Increasing about BMC's Move to Develop Wankhede Stadium into Qurantine Centre | Sarkarnama

आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना पुरवली 'ही' माहिती

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 मे 2020

मुंबईची वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता वानखेडे स्टेडियमचे रुपांतर क्वारंटाईन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार सुरु आहे. त्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे स्वागत केले. त्याला युवा नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटद्वारेच उत्तर दिले

पुणे : लाखो क्रिकेट रसिकांनी ज्या मैदानावर चुरशीचे सामने पाहिले, आवडत्या खेळाडूंचा खेळ अनुभवला त्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे कोरोना क्वारंटाईन केंद्रात रुपांतर करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरुन राजकारण सुरु झाले आहे. त्यातच खेळांची मैदाने पावसाळ्याच्या काळात क्वारंटाईन केंद्रे म्हणून विकसित करणे योग्य होणार नाही, अशी माहिती पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना ट्वीटद्वारे कळवली आहे. 

मुंबईची वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता वानखेडे स्टेडियमचे रुपांतर क्वारंटाईन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार सुरु आहे. त्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे स्वागत केले. वानखेडे बरोबरच 'ब्रेबाॅर्न' स्टेडियमचाही यासाठी विचार करावा, अशी सूचना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली.

त्यानंतर काही वेळातच आदित्य ठाकरे यांनी राऊत यांना उद्देशून एक ट्वीट केले. येणारा पावसाळा लक्षात घेता ज्या ठिकाणी मातीची मैदाने आहेत अशी ठिकाणे क्वारंटाईन केंद्रे म्हणून घेता येणार नाहीत. ज्या ठिकाणी पक्की किंवा काँक्रीटीकरण केलेली जमीन आहे अशी ठिकाणे यासाठी वापरता येतील व ती ठिकाणे आम्ही ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती आदित्य यांनी या ट्वीटद्वारे दिली. 

संबंधित लेख