राजन साळवी...शिवसेनेत त्रास होत असेल तर भाजपमध्ये या.....

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आमदार राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमीकेवरुन जर त्यांना शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन भाजमध्ये यावे, आम्ही त्यांना भाजपकडून निवडून आणू असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे
Nitesh Rane - Rajan Salvi
Nitesh Rane - Rajan Salvi

मुंबई : नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आमदार राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमीकेवरुन जर त्यांना शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन भाजमध्ये यावे, आम्ही त्यांना भाजपकडून निवडून आणू असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे. 

शिवसेना आमदार राजन साळवी यांनी काल नाणार आणि जैतापूर प्रकल्पांबाबत विधाने करत शिवसेनेच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण केला. त्यांच्या वक्तव्यामुळे `मातोश्री`वर मात्र भडका उडाला. त्यामुळे साळवी यांची ही भूमिका शिवसेनेची भूमिका नसल्याचे तत्परतेने स्पष्ट करण्यात आले. जैतापूर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांपैकी तब्बल ९० टक्के जणांनी मोबदला स्वीकारला असल्यामुळे या ऊर्जा प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले. तसेच नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी सरकार पुढाकार घेईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली. 

याबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांच्या पलिकडे नाही. जर जनतेचा विरोध नसेल, प्रकल्प व्हावा ही लोकांची इच्छा असेल तर तो व्हायला पाहिजे, अशी आमची भूमीका आहे. तशी भूमीका देवगडच्या आमदारांनी घेतली, तिच भूमीका राजापूरच्या आमदारांनी घेतली. त्यामुळे जर त्यांना या भूमीकेवरुन शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी राजीमाना द्यावा. आम्ही त्यांना निवडून आणू.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com