उद्धव ठाकरे शिंकले तरी अनिल परब रुमाल द्यायचे...

एनआयएच्या कोठडीत असलेला निलंबित सहायक पोलिस निरिक्षक सचिन वाझेने शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनीही १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केल्यानंतर आता विरोधक चवताळून सरकारवर टीका करत आहेत.
उद्धव ठाकरे शिंकले तरी अनिल परब रुमाल द्यायचे...
Nilesh Rane - Anil Parab

मुंबई : एनआयएच्या NIA कोठडीत असलेला निलंबित सहायक पोलिस निरिक्षक सचिन वाझेने Sachin Waze शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांनीही १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केल्यानंतर आता विरोधक चवताळून सरकारवर टीका करत आहेत. Nilesh Rane used hard hitting words to Criticize Shivsena Leader Anil Parab

''अनिल परब बंगल्यातला म्हणजे मातोश्रीचा जवळचा माणूस हे जगजाहीर आहे. त्याचे धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत जाणारच कारण उद्धव ठाकरे शिंकले तरी रुमाल अनिल परब द्यायचा. स्पॉट नानाचे दिवस फिरले, खूप उड्या मारत होता,'' अशा शेलक्या शब्दात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे NIlesh Rane यांनी परब यांच्यावर टीका केली आहे. 

सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी देखील दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब त्यांनी पत्र लिहून न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येक दोन कोटी रुपये गोळा करण्याचे काम परब यांनी सांगिल्याचा दावा वाझे यांनी केला आहे.

यावर केलेल्या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात....''अनिल परब म्हणतात बाळासाहेबांची आणि मुलांची शपथ घेतो, अरे यांना वकील कोणी केला? कायद्यामध्ये अशी तरतूद नाही. राजीनामा द्या अगोदर. नंतर बाकीची बोलबच्चन. आता उद्धव ठाकरेंचे Uddhav Thackeray क्वारंटाईनचे दिवस वाढतील कारण जेव्हा परिस्थिती अंगाशी येते तेव्हा उद्धव ठाकरे गुल.'' उद्धव ठाकरे हे १०० टक्के अपयशी, पनवती आणि महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. उद्धव ठाकरेंमुळे जगासमोर महाराष्ट्राची Maharashtra बदनामी झाली. कोरोनाबाबत Corona महाराष्ट्र सरकारच्या उदासिनतेमुळे देशाची मान खाली गेली' असेही राणे यांनी म्हटले आहे. Nilesh Rane used hard hitting words to Criticize Shivsena Leader Anil Parab

दरम्यान, अनिल परब यांनी हे आरोप फेटाळले आहेत सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र दिले आहे. सचिन वाझे कस्टडीत आहे.त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रे बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते. प्रदीप शर्मा Pradip Sharma पण शिवसेनेचे Shivsena उमेदवार होते मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने अस काम करायला सांगितलं नाही. केंद्रीय यंत्रणाच वापर कसून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटर बॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील.मी पूर्णपणे कायदेशीर लढणार मी लढाईच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना घाबरत नाही.मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर परब यांनी दिले.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in