शरद पवारांबाबत विकृत पोस्ट करणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल - NCP Youth Wing Files Complaint Against Social Media Posts about Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांबाबत विकृत पोस्ट करणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

शरद पवार यांच्या आजारपणाबाबत सोशल मिडियावर विकृत पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सायबर क्राईम विभागात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आजारपणाबाबत सोशल मिडियावर विकृत पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सायबर क्राईम (Cyber Crime) विभागात तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी दिली आहे. NCP Youth Wing Files Complaint Against Social Media Posts about Sharad Pawar

या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात वरपे म्हणणात, "आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सध्या आजारी आहेत.त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.आदरणीय साहेब तिथे उपचार घेत असून,सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत.जी आमच्यासाठी तसेच आदरणीय साहेबांच्या वर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे." 

"आदरणीय साहेबांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सुर बाहेर पडले. समाजातील असा कोणताही घटक नसेल,ज्यातून साहेबांची ख्याली खुशाली विचारणारे फोन आले नाहीत. परंतु हे काळजीचे जसे फोन येत होते,मेसेजेस येत होते,त्याच्या विरोधात अनेक विकृत मंडळी आदरणीय साहेबांच्या आजारपणाबाबत अतिशय विकृत आणि हिन दर्जाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर (Social Media)  पोस्ट करत होती," असे रविकांत वरपे यांनी यात नमूद केले आहे. NCP Youth Wing Files Complaint Against Social Media Posts about Sharad Pawar

ते पुढे म्हणतात, "भाजपा (BJP) आणि त्यांच्या समर्थकांनी टीकेच्या सर्व मर्यादा पार करत,गेली ५० वर्ष या राज्याचा भार समर्थपणे वाहणाऱ्या आणि आमच्यासाठी आमचा मान,स्वाभिमान असणाऱ्या साहेबांच्यावर केलेली ही टीका अतिशय जिव्हारी लागणारी होती.परिणामी मी आणि माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी या विकृत आणि समाजकंटक लोकांना अद्दल घडविण्याचे ठरवले आहे.आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही मुंबई येथे आदरणीय साहेबांच्या विरोधात विकृत लिखाण करणाऱ्या लोकांच्या विरोधात सायबर क्राईम चे एस.पी.श्री. शिंत्रे साहेब यांची भेट घेऊन सायबर क्राईमला
गुन्हे दाखल केले आहेत,''

''आतापर्यंत आम्ही खूप शिस्तीत भूमिका घेत सोशल मीडियावर व्यक्त होत होतो,आहोत. पण यापुढे मात्र आदरणीय साहेबांच्या वर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केली तर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे निक्षून सांगतो आहोत,''असाही इशारा त्यांनी दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख