NCP Leader Prajakt Tanpure Redicules Nilesh Rane as Child | Sarkarnama

मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 'यांचा' केला 'लहान मुल' असा उल्लेख!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 मे 2020

आमदार रोहित पवार यांच्याबद्दल बोलताना नीलेश राणे यांनी संकेत सोडले. त्यांच्या बोलण्यात सभ्य भाषा असेल असे वाटले होते; परंतु त्यांची शब्दपातळी चांगलीच घसरली. लहान मुलांना वाटते, की आपण अपशब्द बोलून काही तरी पराक्रम केला. त्यामुळे अशा लहान मुलांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे, असा टोला मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी खासदार नीलेश राणे यांना लगावला

नगर : "आमदार रोहित पवार यांच्याबद्दल बोलताना नीलेश राणे यांनी संकेत सोडले. त्यांच्या बोलण्यात सभ्य भाषा असेल असे वाटले होते; परंतु त्यांची शब्दपातळी चांगलीच घसरली. लहान मुलांना वाटते, की आपण अपशब्द बोलून काही तरी पराक्रम केला. त्यामुळे अशा लहान मुलांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे,'' असा टोला मंत्री तनपुरे यांनी माजी खासदार नीलेश राणे यांना लगावला. माजी खासदार नीलेश राणे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात साखर उद्योगाला मदतीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या ट्वीटर वॉरमध्ये आता नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा एकदा उडी घेतली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर तनपुरे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले "नीलेश राणे यांनी उत्तर देताना सभ्यता बाळगायला हवी होती; पण तसे झाले नाही. आमदाराशी असे बोलणे त्यांना शोभणारे नाही.  त्यामुळेच मी त्यांना उपदेश दिला होता. मीनकार्यकर्त्यांनाही सांगितले आहे, की लहान मुलाकडे दुर्लक्ष करा. राणे माझ्याबद्दल काय बोलले, याबाबत दखल घ्यायला मला वेळ नाही. कारण त्यापेक्षा कोरोनाचे संकट मोठे आहे''

''पवार घराणे अत्यंत अभ्यासू, सुसंस्कृत आहे, म्हणूनच राष्ट्रवादीतील कार्यकर्ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात आणि टप्प्यात आल्यावर राष्ट्रवादीवाले कार्यक्रम करतात,'' असा इशारा तनपुरे यांनी राणे यांना दिला होता. तनपुरेंचे हे वक्तव्य राणे यांना झोंबले होते. त्यातून दोघांमध्ये ट्वीटर वाॅर सुरु झाली होती. आता त्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख