महापालिका समिती अध्यक्षासाठी लॉबिंग? आदित्य ठाकरे निर्णय घेण्याची शक्‍यता

मुंबई महानगरपालिकेच्या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून लॉबिंग सुरू झाले आहे. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची खुर्ची खेचण्यासाठी मोठा जोर लावला जात आहे. पालिकेच्या कारभारात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वाढलेले असल्याने अध्यक्षपदाबाबतही तेच निर्णय घेण्याची शक्‍यता आहे
Mumbai Corporation - Aditya Thackeray
Mumbai Corporation - Aditya Thackeray

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून लॉबिंग सुरू झाले आहे. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची खुर्ची खेचण्यासाठी मोठा जोर लावला जात आहे. पालिकेच्या कारभारात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वाढलेले असल्याने अध्यक्षपदाबाबतही तेच निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.

यशवंत जाधव हे सलग दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या आमदारही आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबात किती पदे देणार, असा मुद्दा उपस्थित करत ज्येष्ठ नगरसेवकांनी लॉबिंग सुरू केले आहे. त्याचबरोबर सुधार, बेस्ट, शिक्षण या महत्त्वाच्या समित्यांसाठीही ज्येष्ठ नगरसेवकांकडून लॉबिंग सुरू झाले आहे.

चार वैधानिक समित्यांबरोबरच विशेष समित्यांसाठी नव्या नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शिवसेनेच्या विभागप्रमुखांपासून थेट मंत्रालयापर्यंत लॉबिंग केले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या अनेक प्रकल्पांवरही ते लक्ष ठेवून असतात. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी पालिकेची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची खुर्ची कोणाला मिळणार हे आदित्य ठाकरेच ठरविण्याची शक्‍यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com