जनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - धनंजय मुंडे - Dhananjay Munde Janata Darbar in Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

जनता दरबारात येणाऱ्यांचे प्रश्न जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - धनंजय मुंडे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयामध्ये दर गुरुवारी दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये धनंजय मुंडे यांचा जनता दरबार आयोजित केला जातो त्यानंतर  मुंडे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. 

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या सुचनेनुसार मुंबई पक्ष कार्यालयात सुरू असलेल्या जनता दरबार उपक्रमात सहभाग नोंदवणारे नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते यांचे विविध प्रश्न जागच्या जागीच मार्ग मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असून शक्य तेवढे प्रश्न जागच्या जागीच संबंधितांना फोन करून किंवा पत्र देऊन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयामध्ये दर गुरुवारी दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये धनंजय मुंडे यांचा जनता दरबार आयोजित केला जातो त्यानंतर  मुंडे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी विविध प्रश्न समस्या मागण्या घेऊन आलेल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ना. धनंजय मुंडे यांच्याशी थेट संवाद करत त्यांचे प्रश्न, समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या तसेच शक्य असलेले प्रश्न जागच्याजागी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. 

मुंडे यांच्या धडाडीच्या कार्यशैलीमुळे ते जागच्या जागी प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती अशोक डक यांचे यावेळी स्वागत करत मुंडेंनी अभिनंदन केले, तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान राज्यातील विविध संघटना, विद्यार्थी, तसेच विविध पक्ष कार्यकर्ते सामाजिक न्याय विभागातील विविध योजनांचा लाभ मिळणे, त्याबाबत येणाऱ्या अडचणी यासाठी जनता दरबार उपक्रमांतर्गत आपल्याला भेटत असून, त्यांचे प्रश्न सोडवणे तसेच मागण्या पूर्ण करणे यासंदर्भात आपण कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख