BJP MLA Nitesh Rane Criticizes Government over Mega Employment | Sarkarnama

मेगाभरती हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार : नितेश राणेंची टीका

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. अशा वेळी महाराष्ट्र शासन मेगाभरती करत आहे. हा मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. अशा वेळी महाराष्ट्र शासन मेगाभरती करत आहे. हा मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसे ट्वीट त्यांनी केले आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या पोलीस भरतीबाबतही खासदार संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे.

राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती..
मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ?? 
जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेगा भरती कशाला ??? 
आगीत तेल टाकत आहात..
जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??.......
....असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. 

पोलिस भरतीबाबत संभाजीराजेंची टीका

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खंडपीठासमोर आहे. यामुळे राज्य सरकारने पोलिस भरती करू नये, पोलिस भरती थांबविली नाही, तर मराठा समाजाचा आक्रोश रस्त्यावर दिसेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

मराठा आरक्षण सध्या न्यायप्रविष्ठ असताना, राज्य सरकार पोलिस भरती का करीत आहे, असा प्रश्न संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. ते म्हणतात की सरकारनं मराठा समाजाला चिथावणी दिली आहे. सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. मराठा आरक्षणाशिवाय ही पोलिस भरती करू नये. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असं टि्वट संभाजी राजेंनी केलं आहे. 
 
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याबाबत राज्य सरकारवर टीका केली असून समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते, अशी भूमिका मांडली आहे. या स्थगितीवर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र उदयनराजेंचे मत आले नव्हते. त्यांनी ते आज सविस्तरपणे मांडले आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख