अहवालानंतर शुल्क कमी करण्याचा निर्णय होणार

प्रत्येक विद्यार्थ्याला कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झाल्यावर महाविद्यालयांचे वर्ग सुरु करता येतील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
YIN Samant
YIN Samant


नाशिक : प्रत्येक विद्यार्थ्याला कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झाल्यावर महाविद्यालयांचे वर्ग सुरु करता येतील, (Collages will reopen after Every student will given two vaccine dose) अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज येथे दिली. 

‘सकाळ' माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) (Sakal media group`s Young inspirators network convention) अधिवेशनाला श्री. सामंत यांच्या अभिभाषणाने सुरवात झाली. ते म्हणाले, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही चर्चा झाली आहे. अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयाच्या शुल्कासंबंधी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. 

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अधिवेशनाची सुरवात झाली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. ई. वायूनंदन, (Dr. R Vayunandan) ‘सकाळ' माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, (Shreeram Pawar) आमदार सरोज अहिरे, आमदार सुहास कांदे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे हे उपस्थित होते. 

मागणी असल्यास विद्यार्थी निवडणूक
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या निवडणुकीवरील बंदी उठवणार काय? या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. सामंत यांनी कोरोनामुळे त्यासंबंधीचा तातडीने निर्णय घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थी आणि महाविद्यालयांची मागणी असल्यास त्यासंबंधाने विचार होईल. मात्र निवडणुकांमधून वाईट प्रकार घडणार असल्यास बंदी कायम राहिलेली बरी, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की ऑनलाइन शिक्षण पद्धतीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही यासंबंधीचे निर्णय घ्यायला विद्यापीठांना अधिकार देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाने पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात आले आहे. 

विद्यापीठांनी जिमखाना शुक्ल बंद केले आहे. ग्रंथालय आणि प्रयोगशाळा शुल्कात पन्नास टक्के माफी देण्यात आली आहे. शिवाय पूर परिस्थितीमुळे तंत्रशिक्षण, अभियांत्रिकीची परीक्षा देता आली नाही म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरु नये. पुढील महिन्यात परीक्षा घेतली जाईल. राज्यात आवश्‍यकता असलेल्या ठिकाणी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय सर्वेक्षण करुन घेतला जाईल. रत्नागिरीमध्ये सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु होत आहे.

‘यिन'च्या शॅडो कॅबिनेटमधील मुख्यमंत्री अजय खांडबहाले, उपमुख्यमंत्री विशाल पाटील, आरोग्यमंत्री आकाश हिरवळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री प्रवीण कोळपे, नगरचे अनिकेत कुलकर्णी यांनी राज्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये असलेले प्रश्‍न विचारले. त्यांना श्री. सामंत यांनी उत्तरे दिली.
...
नेतृत्व हे टीमवर्क आहे. नेतृत्व करत असताना इतरांना सोबत घेऊन जावे लागते. शिवाय नेतृत्व करणे सहजशक्य आहे. मात्र त्यात सातत्य राखणे कठीण आहे. महाराष्ट्रात चांगले नेतृत्व तयार होत आहे. कोरोना आपत्तीच्या काळात ऑनलाइन शिक्षणाबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरुंच्या पंधरा बैठकी घेतल्या. पाचव्या बैठकीनंतर परीक्षा घेण्यासंबंधीच्या स्पष्ट कल्पना त्यांच्या बोलण्यातून दिसायला लागल्या होत्या. इतका पुढाकार इतर राज्यात घेतलेला दिसत नाही.
- प्रा. डॉ. ई. वायूनंदन (कुलगुरु, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)

....
मागील पिढीपेक्षा पुढील पिढी अधिक सजग असते. पुढील पिढीतील त्रूटी दुरुस्त करणे ही मागील पिढीची जबाबदारी आहे. त्यासाठी शिबिरांची गरज असते. चर्चा, वाग, एकमेकांशी मतभेद पुढे यावेत यातून लोकशाही पुढे जाते. नेमके हेच महत्वाचे सूत्र ‘यिन'च्या शॅडो कॅबिनेटमागील आहे. आपले, भोवतालचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी ‘यिन' व्यासपीठ कार्यरत आहे.
- श्रीराम पवार (संपादक संचालक, ‘सकाळ' माध्यम समूह)

....
तंत्रज्ञानाचा सहाय्याने भ्रष्टाचार कमी होऊ लागला आहे. पण तरीही भ्रष्टाचाराची संधी मिळेल अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये धोरणांची आखणी केली जाऊ नये. लोकांची मते घेण्यासाठी त्यांना आकर्षित करण्याचे राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या गरजा काय आहेत, त्यांची सोडवणूक कशी करता येईल याला अधिक महत्व देण्याची आवश्‍यकता आहे. तरुणाईने पाण्याच्या प्रश्‍नाला जोडून घेत पाण्याचा पुनर्वापर, पुनर्भरण आणि सन्मान वाढवणे यादृष्टीने कार्यरत व्हावे.
- व्ही. प्रकाश राव (अध्यक्ष, तेलंगणा जलसंवर्धन विकास महामंडळ)
...

u

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com