मुंडेंवर आरोप करणारी महिला म्हणते, 'तुमची इच्छा असेल, तर मीच माघार घेते' - The woman who accused Dhananjay Munde says, "If you want, I will withdraw." | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

मुंडेंवर आरोप करणारी महिला म्हणते, 'तुमची इच्छा असेल, तर मीच माघार घेते'

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

मी जर चुकीची आहे, तर एवढे दिवस हे लोक पुढे का आले नाहीत?

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात भाजपचे कृष्णा हेगडे, मनसेचे मनीष धुरी, जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने ब्लॅकमेलिंगचे आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संबंधित महिलेने ट्विट करत "तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे आपण आता माघार घेत आहोत,' असे म्हटले आहे. 

मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात हेगडे यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर मनीष धुरी, जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्यानेही आरोप केला होता. त्यानंतर आज मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही संबंधित महिलेविराधात तक्रार दिली आहे. या सर्व प्रकरणानंतर त्या महिलेने माघार घेत असल्याचे ट्‌विटद्वारे जाहीर केले आहे. 

ट्विटमध्ये त्या महिलेने म्हटले आहे की, "एक काम करा. तुम्ही सर्वजण मिळून निर्णय घ्या. जे मला ओळखता, तेही कोणतीही माहिती जाणून न घेता माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वजण मिळून निर्णय घ्या. तुम्हा सर्वांच्या इच्छेप्रमाणे मीच आता माघार घेते.'' 

ती ट्विटमध्ये पुढे म्हणते की, "मी जर चुकीची आहे, तर एवढे दिवस हे लोक पुढे का आले नाहीत? मी जरी मागे हटले तरी मला माझ्या स्वतःवर गर्व आहे. कारण मी कोणत्याही पक्षाचे नाव न घेताही मला खाली पहायला लावण्यासाठी आणि मला हटविण्यासाठी एवढ्या सर्वांना एकत्र यावे लागले. त्या सर्वांविरोधात महाराष्ट्रात मी एकटी लढत होती, त्याचा मला अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे, ते लिहा.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख