शिवसेनेचे अनिल परब आता देणार फडणवीसांना उत्तर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या मदतीबद्दल सादर केलेली आकडेवारी खोडून काढण्याचे काम शिवसेनेने परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यावर सोपवली आहे. आज दुपारी ते या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत
Anil Parab To Answer Devendra Fadanavis
Anil Parab To Answer Devendra Fadanavis

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या मदतीबद्दल सादर केलेली आकडेवारी खोडून काढण्याचे काम शिवसेनेने परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यावर सोपवली आहे. आज दुपारी ते या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आभासी आकड्यांची सत्य स्थिती याबाबत परब माध्यमांशी बोलणार आहेत. हे आकडे खरे की खोटे याबाबतची माहिती ते या पत्रकार परिषदेत सादर करणार आहेत. कालच परब यांनी या आकडेवारीवरुन फडणवीस यांना लक्ष्य केले होते. फडणवीस, तुम्ही मांडलेल्या आकड्यांची पोलखोल सोप्या भाषेत केली जाईल असे परब यांनी म्हटले होते. परब यांच्याप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता.

''सरकारला ठाऊक आहे, काय करायला हवं,कसं सरकार चालवलं जातंय ते. महाराष्ट्र सरकारला काही कळत नाही, आमच्या सल्ला ऐकलं तरच सरकार चालेल , तरच कोरोनामुक्त महाराष्ट्र होईल असं आज जनतेशी संवाद साधताना फडणवीस म्हणत होते. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार सर्वतोपरी प्रयत्न करून या संकटावर मात करतायत हे त्यांनी लक्षात घ्यावे. अर्थ गणित काहीही मांडून जनतेची दिशाभूल करू नका, आज ही राजकारण करण्याची वेळ नाही. जनतेला हे कळते,'' असे सांगत परब यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com