सुरक्षा कपातीचा निर्णय म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे, सूडबुद्धीचं राजकारण 

सुरक्षा काढून घेतली तरी जनसेवेचे व्रत कायम सुरू राहील.
 keshav upadhye criticizes state government over security cuts
keshav upadhye criticizes state government over security cuts

मुंबई : "विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडीही काढली जाणार आहे. त्याशिवाय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सुडाचे राजकारण आहे,'' अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

राज्यातील विविध नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यात फडणवीस, पाटील, दरेकर, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड, नारायण राणे, आशिष शेलार या भाजप नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे. या निर्णयाबद्दल भाजपकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातूनच उपाध्ये यांनी ट्‌विट करत सरकारला लक्ष्य केले आहे. 

ट्‌विटमध्ये ते पुढे म्हणतात की, "भारतीय जनता पक्षाचे हे सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात. कोरोना महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसलेले होते. त्या वेळी विरोधी पक्षनेते असलेले फडणवीस हे महाराष्ट्रात सर्वाधिक फिरले आणि जनतेला दिलासा दिला होता. कालही भंडारा येथे तेच प्रथम पोचले. या नेत्यांच्या सुरक्षितता कपात करणे हे निव्वळ सूडबुद्धीचं राजकारण आहे.'' 

"कायम घरात बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षितता वाढवली जाते आणि कायम जनतेत काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा कपात केली जाते. पण, सुरक्षा काढून घेतली तरी जनसेवेचे व्रत कायम सुरू राहील,'' असेही केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com