Give Ward Wise Breakup of Coroan Deaths Nitesh Rane Demands | Sarkarnama

प्रभागनिहाय मृत्यूंची माहिती द्या नितेश राणेंचे मुंबई पालिका आयुक्तांना पत्र

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 जून 2020

मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. यातील अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत; मात्र याबाबतची आकडेवारी चुकीची सांगितली जात असल्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत, असे आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे

मुंबई  : मुंबईतील कोरोना रुग्णांची माहिती सुसंगत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. तो दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रभागनिहाय मृतांची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त इक्‍बालसिंग चहल यांना आमदार नितेश राणे यांनी पत्र पाठवले आहे. जगात सहा महिन्यांपासून कोरोना महामारीने थैमान घातले असून, मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. यातील अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत; मात्र याबाबतची आकडेवारी चुकीची सांगितली जात असल्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत, असे राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मुंबईतील कोरोनाची अद्ययावत माहिती नागरिकांना मिळणे आवश्‍यक आहे. यासाठी मुंबई महापालिकेने मृत रुग्णांची माहिती प्रभागनिहाय उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येबाबत मोठा गोंधळ झाला होता.  याबाबत खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सरकारने १३२८ मृत्यू असल्याचे जाहीर केले होते. त्यात मुंबईतील 862 मृत्यूंचा समावेश होता.

दरम्यान, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशातील सहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्याचा समावेश आहे. मुंबईनंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद या शहरांचे क्रमांक लागतात. त्यानंतर गुडगाव, इंदूर, हैदराबाद या शहरांतील कोरोनाबाधितांची संख्या ४००० वर पोहोचली आहे.

पहिली सहा शहरे
शहर रुग्ण मृत्यू
मुंबई 64,139 3425
दिल्ली 53,116 2035
चेन्नई 38,327 529
ठाणे 22,033 675
अहमदाबाद 18,258 1296
पुणे 14,704 610

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख