CONGRATS  : जागतिक आरोग्य संघटनेकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक  - CONGRATS: World Health Organization praises Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

CONGRATS  : जागतिक आरोग्य संघटनेकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 जुलै 2020

मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. मात्र मुंबई महापालिकेने येथील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवले आहे. 

मुंबई : कोरोनाच्या मुद्यावर एकीकडे राज्यातील विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करीत असताना दुसरीकडे मात्र जागतिक आरोग्य संघटनेते मुख्यमंत्री ठाकरे यांचे कुौतक केले आहे. 

देशात आणि राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतही कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत धारावी झोपडपट्टीत कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे.

धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले, अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केले आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यात घारावी पॅटर्नची चर्चा सुरू आहे. 

मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. मात्र मुंबई महापालिकेने येथील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवले आहे. 

गेल्या महिन्यात धारावीत दिवसाला 80 ते 90 रुग्ण आढळले होते. त्यामुळे धारावीत कोरोनाला आवरणे कठीण झाले होते. दाटीवाटीचा परिसर असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण झाले होते. त्यानंतर पालिकेने धारावीकडे विशेष लक्ष देत अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता धारावीतील आकडे कमी झाल्याचा दावा प्रशासन करत आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. 

मुंबईसह राज्यातील कोरोनाचे संकट हाताळण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने करीत आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेनेचे सरकारच्या कामाची दखल घेतल्याने आघाडीच्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख