अर्णब गोस्वामींना दणका : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल 

तक्रार दाखल झाल्यानंतर नऊ महिन्यांनी पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांचे नाव आरोपपत्रात दाखल केले आहे.
Chargesheet filed against Arnab Goswami in TRP scam
Chargesheet filed against Arnab Goswami in TRP scam

मुंबई : टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. २२ जून) ‘रिपब्लिक टीव्ही‘चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह सात जणांविरोधात पुरवणी आरोपपत्र एस्प्लनेट न्यायालयात दाखल केले आहे. सुमारे १९१२ पानांचे हे आरोपपत्र आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर नऊ महिन्यांनी पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांचे नाव आरोपपत्रात दाखल केले आहे. (Chargesheet filed against Arnab Goswami in TRP scam)

पोलिसांनी न्यायालयात १९१२ पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोप पत्रानुसार ज्या घरात टीआरपी पडताळणीसाठी बारोमीटर लावला होता, त्या व्यक्तींना पैसे देऊन ठरावीक वाहिनी पाहण्यास सांगण्यात आले होते. याशिवाय एकाच वाहिनीला दोन एलएसएन देण्यात आले होते. जेणेकरून दोन वाहिन्यांची टीआरपी या वाहिनीला मिळत होती. याशिवाय टीआरपीचे आकडेही बदलण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पुरवणी आरोप पत्रामध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी, चीफ फायनान्शियल ऑफिसर शिवा सुब्रमण्यम, प्रिया मुखर्जी व इतर अधिकारी शिवेंद्र मुंधेरकर, अमित दवे, संजय वर्मा व रणजित वालटकर यांची नावे आहेत. या प्रकरणातील दुसरे आरोपपत्र १६०० पानांचे होते. त्यात सात आरोपींची नावे होती. 

या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेले आरोप तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे, रियाझ काझी यांनी केला होता. या प्रकरणी पहिल्या आरोपपत्रात २२ आरोपी असल्याचा उल्लेख होता; पण आतापर्यंत १५ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

टीआरपी प्रकरणातील ठळक मुद्दे

► आतापर्यंत १५ आरोपींना अटक
► बारा आरोपींविरोधात १३७२ पानांचे पहिले आरोपपत्र २९             नोव्हेंबरला दाखल
► अकरा जानेवारीला दुसरे ३५६५ पानांचे आरोपपत्र दाखल
► बावीस जूनला १९१२ पानांचे आरोपपत्र दाखल
► सात जणांविरोधात आरोपपत्र त्यात दोन महामुव्ही, तर पाच         रिपब्लिक वाहिनीशी संबंधित
► आरोपींविरोधात व्हॉट्सअॅप, ई-मेल सापडल्याची पोलिसांची         माहिती
► टीआरपीचे आकडे वाढवण्याबाबत बार्कच्या प्रतिनिधींमध्ये           चर्चा झाल्याचे तांत्रिक पुरावे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com