मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले असून काही वेळापूर्वी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाच्या दहशतीतही रस्त्यांवर उतरत, लोकांमध्ये मिसळून भल्या पहाटेपासून काम करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर २६ आॅक्टोबरला मुंबईत ब्रीच कॅडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र, ते निगेटिव्ह असल्याचे अहवाल आले. परंतु, २६ आॅक्टोबरला पुन्हा एकदा त्यांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली: तेव्हा त्यांचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आला होता.
त्या आधी अजित पवार यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले होते. त्या काळात देवगिरी या आपल्या शासकीय निवासस्थानातून कामकाज सुरु ठेवले होते. आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. शासकीय नस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु ठेवली होती.
Edited By - Amit Golwalkar

