उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी होणार नाहीत?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे आज मुंबईच्या आझाद मैदानापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे आज मुंबईच्या आझाद मैदानापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  तीन दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे नेते आजच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत असे सांगण्यात आले होते. आझाद मैदानातून तीन वाजता लॉंग मार्च सुरू होणार आणि तो मेट्रो जवळ अडवला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ हे राजभवनावर जाईल, असेही कळविण्यात आले आहे.

मात्र, प्रत्यक्षात उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसबरोबरच शिवसेनेलाही निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती  अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी दिली आहे. या मोर्चाला संबोधित करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, दोन महिन्यापासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. नवा इतिहास घडविणारं हे आंदोलन आहे. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यासाठी आहे, असे माऩण्याचे कारण नाही. केंद्र सरकारने व्यापाऱ्यासाठी हे कायदे केले आहेत, त्यामुळे साठेबाजी करायची, हा सरकारचा डाव आहे, असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com