सुशांतसिंह प्रकरणात ठाकरे सरकार कोणाला वाचवत आहे ? राम कदमांचा सवाल  - Whom is the Thackeray government saving in the Sushant Singh case? Question of Ram Kadam | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह प्रकरणात ठाकरे सरकार कोणाला वाचवत आहे ? राम कदमांचा सवाल 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांत रजूपतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत व्हावा अशी मागणी सुशांतच्या वडलांनी काल नितीशकुमार यांच्याकडे केली होती.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांना हस्तक्षेप न करता काम करू दिले असते तर एवढी नामुष्की मुंबई पोलिसांवर ओढावली नसती अशी खरमरीत टीका भाजपचे नेते आणि प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे. 

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. जर सुशांतसिंह याचे कुटुंबीय सीबीआयची मागणी करीत होते हे प्रकरण सीबीआयकडे का दिले नाही असा सवाल न्यायलयाने महाराष्ट्र सरकारला केला आहे. 

महाराष्ट्र सरकार नेमकं या प्रकरणामध्ये कोणाला वाचवत आहे असा सवाल करून कदम म्हणाले, की या प्रकरणात महाराष्ट्र सरकार मुंबई पोलिसांत हस्तक्षेप करायला नको होता. सुशांतच्या वडीलांसह संपूर्ण देशाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे व्हावा अशी मागणी केली होती. तरीही सरकार ऐकत नव्हते. कोणाला वाचवायचे आहे यांना असा सवालही त्यांनी केला. 

सोमय्यांचीही टीका 
सुशांतसिंहच्या वडिलांना आता न्याय मिळेल अशी अपेक्षा आहेत असे सांगून माजी खासदार किरीट सोमैय्या यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, की महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त ठाकरे यांचे सेक्रेटरी म्हणून काम करताना दिसत आहे. त्यांना स्वतंत्र मिळालं तर योग्य तपास करतील. सुशांतिसिंह हत्या आणि आर्थिक व्यवहार याची आता सखोल चौकशी होणार आहे. मुंबई पोलीसांमध्ये क्षमता आहे मात्र, सीबीआयच्या मदतीने चांगला तपास होईल असे वाटते. 

"" अभिनेता सुशांत रजूपतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत व्हावा अशी मागणी सुशांतच्या वडलांनी काल नितीशकुमार यांच्याकडे केली होती. त्याची दखल त्यांनी केंद्राकडे सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती त्यानुसार केंद्राने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. 

सुशांत आत्महत्याप्रकरणी बिहारमध्ये सर्वच पक्षांचे नेते आक्रमक झाले असून या प्रकरणावर सर्वच पक्ष एकत्र झाले आहेत. सर्वचजण एकमुखी मागणी करीत आहेत की सीबीआय चौकशी व्हावी म्हणून. आतापर्यंत सुशांतच्या वडील के.के.सिंह यांनी कोणती चौकशी करावी हे स्पष्ट केले नव्हते. पण, ते नितीशकुमार यांच्याशी बोलले. त्यांनी सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी सीबीआय तपास करण्याची मागणी करतानाच तसा आदेश द्यावर अशी विनंती केली होती.. 

सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस योग्य पद्धतीने करीत आहेत. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरजच नाही असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख