सचिन वाझे आता कुणाकुणाची नांवे घेणार? वरिष्ठ अधिकारी-राजकारणी गॅसवर

सचिनवाझे कोठडीत आहेत. या सगळ्या प्रकरणात शिवसेनेच्या काही मंत्र्यांचाही सहभाग असल्याचा आरोप भाजपच्या किरिट सोमय्यांसारख्या काही नेत्यांनी केला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही याच प्रकरणात एका युवा नेत्याचे नांव घेतले आहे. त्यामुळे वाझे यांच्या पोटातून किती जणांची नांवे ओठावर येतील, हे पुढच्या काही दिवसांत दिसणारच आहे.
Sachin Waze Mystery in Antellia Car Bomb Case
Sachin Waze Mystery in Antellia Car Bomb Case

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया  निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्या प्रकणात NIA ने मुंबई पोलिस दलातले सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा उठला आहे. आपल्या २८ तारखेपर्यंतच्या NIA २५ मार्च पर्यंतच्या पोलिस कोठडीच्या वास्तव्यात सचिन वाझे कुणा कुणाची नांवे घेणार याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. 

वादग्रस्त ठरलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना पुन्हा खात्यात घेतल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. घाटकोपर बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूसच्या मृत्यूप्रकरणात वाझे काही काळ तुरुंगात होते. त्यानंतर पुन्हा त्यांना खात्यात सामावून घेण्यात आले. आता पुन्हा एकदा वाझे अडचणीत आले. पुन्हा एकदा त्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. अँटेलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ ठेवली गेल्यानंतर एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा तिथे आली होती. तिच्या चालकाने पीपीई किट घातले होते. ही गाडी पोलिसांचीच असल्याचे व वाझे गुन्हे अन्वेषण शाखेच्या ज्या CIU (क्राईम इंटिलिजन्स युनिट) शाखेत नेमणुकीला होते, त्याच पथकाची ही गाडी असल्याचे NIAच्या तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या युनिटशी संबंधित काही अन्य अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार आहे. 

आता वाझे कोठडीत आहेत. या सगळ्या प्रकरणात शिवसेनेच्या काही मंत्र्यांचाही सहभाग असल्याचा आरोप  भाजपच्या किरिट सोमय्यांसारख्या काही नेत्यांनी केला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही याच प्रकरणात एका युवा नेत्याचे नांव घेतले आहे. त्यामुळे वाझे यांच्या पोटातून किती जणांची नांवे ओठावर येतील, हे पुढच्या काही दिवसांत दिसणारच आहे. 

हे देखिल वाचा - 

वाझे ज्यावेळी खात्याबाहेर होते तेव्हा ते काही काळ शिवसेनेत होते. त्या काळात सध्या मुंबई पोलिस दलात वरिष्ठ पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याचा व वाझे यांचा संपर्क होता. या अधिकाऱ्यामुळेच वाझेंची मुंबई पोलिस दलात पुन्हा 'एंट्री' सुकर झाल्याचे बोलले जाते. मुंबई पोलिस दलातलेच काही अधिकारी वाझेंच्या पुन्हा खात्यात येण्यावरुन नाराज आहेत. अँटेलिया प्रकरण व त्यानंतर घडलेले मनसुख हिरेन मृत्यू प्रकरम यानंतर वाझे यांनी याच अधिकाऱ्याशी संपर्कात होते. त्यामुळे या अधिकाऱ्याकडेही NIAची दृष्टी पडते याबद्दल पोलिस खात्यात उत्सुकता आहे. 

पांढऱ्या रंगाच्या स्काॅर्पिओमधून पीपीई किट घातलेला जो ड्रायव्हर उतरला होता ती व्यक्ती सचिन वाझेच होती, असेही बोलले जात आहे. एकतर या साऱ्याच प्रकरणात मोठे गूढ आहे आणि दिवसेंदिवस ते वाढते आहे. सचिन वाझे हे सहाय्यक पोलिस निरिक्षक होते. पोलिस खात्याच्या पदांच्या उतरंडीत हे पद अतिशय लहान आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकरणात ते एकटे असतील, हे संभवत नाही. या सगळ्यामागे काही राजकीय खेळी आहे का, याचीही चर्चा सुरु झाली आहे.

वाझे केवळ एकट्याच्या जोरावर हे सारे हाताळू शकते हे पटण्यासारखे नाही. अँटेलियाबाहेर स्फोटके भरलेली गाडी ठेवण्यापासून ते मनसुख हिरेन यांच्या मृत्यूपर्यंत साऱ्याच प्रकरणात वाझेंच्या मागे मोठी शक्ती उभी राहिली हे उघड आहे. ही मोठी शक्ती नेमकी राजकीय होती की खात्यातली होती हे उघड व्हायचे आहे. त्यासाठी NIAच्या कसलेल्या अधिकाऱ्यांना २५ तारखेपर्यंत वाझेंचा मिळालेला ताबा पुरेसा आहे. वाझेंच्या पोलिस कोठडीच्या काळात कुठली नांवे येतात याचीच आता प्रतिक्षा आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com