Which minister will resign for Khadse? Jayant Patil said.....
Which minister will resign for Khadse? Jayant Patil said.....

खडसेंसाठी कोणता मंत्री राजीनामा देणार? जयंत पाटील म्हणाले... 

एकनाथ खडसे यांच्या पुनर्वसनाची चिंता कोणी करू नये.

मुंबई : "भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पुनर्वसनाची चिंता कोणी करू नये. त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार आहे, अशा अफवा पसरवू नका. या चर्चांना पूर्णविराम दिला तर बरं होईल,' असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सुरू असलेली चर्चा थांबविण्याचा प्रयत्न केला. 

एकनाथ खडसे यांचा उद्या मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. 

खडसे यांच्याबरोबर आणखी कोण कोण उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, यावर पाटील म्हणाले की आम्ही खासदार किंवा आमदार यांना घेऊन येण्यास सुचवत नाही. संबंधित आमदारांना वेळ आल्यावर नक्की प्रवेश देण्यात येणार आहे. खडसे हे प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश करतील.

खडसे यांचे पुनर्वसन करण्याबाबत कोणीही चिंता करू नये. त्यासाठी कोणत्या तरी मंत्र्यांस राजीनामा द्यावा लागणार, अशा अफवा पसरवू नका. या चर्चांना पूर्णविराम दिला, तर बरं होईल. खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यावर पक्ष संघटना वाढविण्याबाबत विचार होईल.' 

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होण्याचा संभव आहे. त्याबाबत आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली, असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वेळी नमूद केले. 

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, राज्य सरकार नक्कीच मदत करणार आहे. निधीची उभारणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे होम क्वारंटाइन झाले आहेत, याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित पवार आजारी पडले आहेत. त्यांना सर्दीचा त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्‍टरांनी त्यांनी आराम करायला सांगितला आहे, त्यानुसार ते आराम करत आहेत. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com