..मग खडसेंच्या अटकेची गरज काय? उच्च न्यायालयाचा सवाल?

एकनाथ खडसे ईडीला चौकशीत सहकार्य करत असतील तर त्यांच्यावर अटकेची कारवाई कशासाठी, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं सक्तवसुली संचनालयाला (ईडी) केली आहे. भोसरीतील भूखंड प्रकरणात ईडीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली आहे.
Ekanath Khadse
Ekanath Khadse

मुंबई :  एकनाथ खडसे ईडीला चौकशीत सहकार्य करत असतील तर त्यांच्यावर अटकेची कारवाई कशासाठी, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं सक्तवसुली संचनालयाला (ईडी) केली आहे. भोसरीतील भूखंड प्रकरणात ईडीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली आहे.

ईडी आपल्यावरील आरोपांचा गैरवापर करत असून जो पर्यंत सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत अटकेची कारवाई करु नये, यासाठी खडसेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड गैरव्यवहाराबाबत ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी अटक होण्याच्या शक्‍यतेमुळे भारतीय जनता पक्षामधून नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ईडीने राजकीय आकसापोटी तपास सुरू केला आहे. त्यामुळे ही फिर्याद रद्द करावी, अशी मागणी खडसे यांनी याचिकेत केली होती. चौकशीची व्हिडीओ शुटिंगही करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे४ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाने खडसेंवरील कारवाईला अंतरीम स्थगिती दिली होती. 

दरम्यान, भोसरी भूखंड भ्रष्टाचार प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साक्षीदार म्हणून जबाब घेण्याची मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आली आहे. याप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध पुण्यातील न्यायालयात दावा सुरू आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com