मुंबईत धो.. धो..! धनंजय मुंडे तीन तास अडकले  - Wash in Mumbai .. wash ..! Dhananjay Munde stuck for three hours | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत धो.. धो..! धनंजय मुंडे तीन तास अडकले 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

मुंबईत मंगळवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

मुंबई : मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. तसेच मुंबई महापालिकेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. 

दरम्यान,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही मुंबईतल्या आजच्या मुसळधार पावसाचा फटका बसला असून मागील 3 तासापासून ते ईस्टर्न फ्री way वर अडकून पडले आहेत. मुंबईत आज आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते आज सकाळी परळी ( बीड ) वरून निघाले होते. मात्र अडकून पडल्याने त्यांना बैठकीला ही हजर राहता आले नाही 

मुंबईत मंगळवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्‍यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलिस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा आणि एनडीआरएफच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी. 

त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीजपुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असललेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही, हे पाहण्याच्या सूचना केल्या आहेत. 

रायगड 
- रोहा तालुक्‍यातील कुंडलिका नदीला पूर. जनजीवन पूर्णतः विस्कळीत 
- वादळी वाऱ्यामुळे खारघरमधील अनेक झाडे पडली. 
- अतिवृष्टीमुळे माणगाव तालुक्‍यातील सोन्याची वाडी गावाभोवती पाण्याची पातळी वाढली. ते ग्रामस्थ अडकले. 
- महाडमधील पूरपरिस्थिती दुसऱ्या दिवशी आणखी गंभीर. 
- काळ, सावित्री व गांधारी नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली. 
- घोडनदीवरील कळमजे येथील पुलावरून पाणी. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीस मनाई. 

पालघर 
- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत पावसामुळे वाहतूक कोंडी 
- उत्तन बंदरातील बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड. खलाश्‍यांसह बोट बेपत्ता. 
- मुसळधार पावसामुळे विरार हद्दीतील तानसा नदीला पूर. भाताने-पांढरतारा पूल पाण्याखाली. 
- बोर्डी परिसरात रात्रभर पावसाचे थैमान. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा. 

ठाणे 
-कल्याण पूर्वमधील विष्णू पावशे चौकात विजेच्या धक्‍क्‍याने तीन गायींचा जागीच मृत्यू. 
-भिवंडीतील कामवारी नदीला पूर. म्हाडा कॉलनी, ईदगाह रोड येथील रहिवाशांचे स्थलांतर. 
- नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील छप्पर कोसळले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख