माजी सैनिक मारहाण प्रकरणी भाजप खासदार उन्मेष पाटलांची होणार चौकशी - Unmesh Patil will be probed said Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

माजी सैनिक मारहाण प्रकरणी भाजप खासदार उन्मेष पाटलांची होणार चौकशी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

२०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने उन्मेष  पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असे अनिल देशमुख यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मुंबई : २०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

२०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असे देशमुख यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मुंबईत निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीनंतर शिवसेना व महाविकास आघाडीला विरोधकांनी टीकेचे लक्ष्य बनवले. त्यावर काँग्रेस नेते सचीन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. मुंबईत झालेल्या या प्रकरणात तत्काळ एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जळगाव प्रकरणी तशी तत्परता का दाखवली गेली नाही याचे उत्तर भाजपाने द्यावे, असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.

जळगावमधील माजी सैनिक सोनु महाजन यांच्यावर २०१६ मध्ये भाजपाचे तत्कालिन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला, असा त्यांच्यावर आरोप आहे. राज्यात त्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते, तेच गृहमंत्रीही होते तरीही एफआयआर सुद्धा दाखल करुन घेतला नाही, असा भाजप विरोधकांचा आक्षेप आहे. उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु आजपर्यंत उन्मेष पाटील यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख