भाजपच्या मोठ्या नेत्याने घेतली शिवसेना नेत्याची भेट 

मुख्यमंत्री मनोहरजोशी यांच्या मंत्रिमंडळात गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे.
Union Minister Nitin Gadkari met to Manohar Joshi
Union Minister Nitin Gadkari met to Manohar Joshi

मुंबई : केंद्रीय रस्तेबांधणी आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे आज (ता. 7 जानेवारी) मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सायंकाळी त्यांची बैठक होत आहे. तत्पूर्वी गडकरी यांनी मुंबईत दाखल होताच शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. 

गडकरी यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्यात 1995 मध्ये सत्तेवर आलेल्या युतीच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. 

दरम्यान, राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते शिवसेनेवर आणि त्यांच्या नेत्यांवर टिका करत असताना गडकरी यांचे मात्र शिवसेना नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. परवा नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांचे गडकरी यांनी कौतुक केले होते. तसेच, परब यांनीही गडकरी यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक करत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली होती. 

दरम्यान, नितीन गडकरी हे सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी सह्याद्री अतिथीगृहात चर्चा करणार आहेत. 

सध्या राज्यात महाविकास आघाडीतले घटक पक्ष आणि विरोधात असलेला भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. विविध मुद्यांवरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याची उत्सुकता आहे. 

एका बाजूला भाजप शिवसेनेवर हल्ले करत असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन भाजपला लक्ष्य बनवत आहेत. शिवसेना नेते प्रताप सरनाईक, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांना आलेल्या ईडीच्या नोटिसांवरुन शिवसेना भाजपच्या विरोधात आक्रमक झाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी राष्ट्रीय महामार्गांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती गडकरी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तरीही या बैठकीत उपस्थित राहणाऱ्या नेत्यांची नावे पाहता राजकीय वर्तुळातली उत्सुकता संपलेली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com