वृक्षलागवड प्रकरण - ठाकरेंची क्लीन चिट; भरणेंकडून मात्र चौकशीची घोषणा - Uddhav Thackeray Clean Chit to Surdhir Mungantiwar | Politics Marathi News - Sarkarnama

वृक्षलागवड प्रकरण - ठाकरेंची क्लीन चिट; भरणेंकडून मात्र चौकशीची घोषणा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

भाजपचे सरकार असताना तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या वृक्षलागवड योजनेत कुठलाही गैरव्यवहार नाही, असा निर्वाळा एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तरात दिलेला असतानाच दुसरीकडे वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मात्र या प्रकरणात विधीमंडळाची चौकशी समिती नेमण्याची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. 

मुंबई : भाजपचे सरकार असताना तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या वृक्षलागवड योजनेत कुठलाही गैरव्यवहार नाही, असा निर्वाळा एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तरात दिलेला असतानाच दुसरीकडे वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मात्र या प्रकरणात विधीमंडळाची चौकशी समिती नेमण्याची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. 

वृक्ष लागवडीची विधिमंडळाच्या समितीतर्फे चौकशी करण्याची काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी मागणी केली होती. त्या मागणीवर वन राज्यमंत्री भरणे यांची विधिमंडळाची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याची योजना सुरु केली होती. त्यावर काही आमदारांनी लेखी प्रश्न विचारला होता. या योजनेचा निधी खर्च होऊनही प्रत्यक्ष वृक्षलागवड केली गेली नाही, असा आक्षेप घेत प्रश्न विचारला होता. त्यावर चौकशी समिती नेमली आहे काय व नेमली नसल्यास विलंबाची कारणे काय, असेही विचारण्यात आले होते. 

त्याला लेखी उत्तर देताना या योजनेवर २४२९.७८ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्या निधीचा पूर्ण वापर झाला असून २८.२७ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच आॅक्टोबर २०२० अखेर ७५.६३ टक्के रोपे जिवंत असून त्यांची देखभाल करण्यात येत आहे, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. चौकशीच्या प्रश्नावर 'याबाबत प्रश्न उद्भवत नाही,' असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. 

वृक्ष लागवडीची विधिमंडळाच्या समितीतर्फे चौकशी करण्याची काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी मागणी केली होती. त्या मागणीवर वन राज्यमंत्री भरणे यांची विधिमंडळाची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी २०१४ ते २०१९ या कालावधीत २ हजार ४२९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. वृक्ष लागवड हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, यात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची चौकशी समिती नेमावी, अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली. एक झाड किती किंमतीला खरेदी केले, कोणत्या नर्सरीमधून खरेदी केली गेली याची माहिती समोर आली पाहिजे, अशी नाना पटोले यांनी मागणी केली. ही चौकशी सहा महिन्यांत पूर्ण होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज दिली. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख